Author: Ashok Kummari

Ashok Kummari

मुख्य संपादक : अशोक कुम्मरी M.C. Journalism 📞 मो. नं. : 7588302155 / 9356288240

ए बी के न्यूज लाईव्ह  ​सेलू/अभय बेदमोहता  तालुक्यातील केळझर येथील बँक ऑफ महाराष्ट्र शाखेत कार्यरत या महिला कर्मचाऱ्याच्या मुजोरी आणि अरेरावीच्या कारभारामुळे सामान्य नागरिक, शेतकरी व वृद्ध ग्राहक त्रस्त झाले आहेत. तब्बल १५ गावांच्या कार्यक्षेत्राचा विस्तार असलेल्या या शाखेत नेहमीच ग्राहकांची गर्दी असते; परंतु येथील काही कर्मचाऱ्यांच्या अपमानास्पद वागणुकीमुळे बँकेच्या कामकाजावर संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत.​मिळालेल्या माहितीनुसार, पासबुक प्रिंटिंगसारख्या साध्या आणि दैनंदिन कामासाठी ग्राहकांना सकाळी ११ वाजेची कडक वेळ पाळण्याची दमदाटी दिली जाते. “१० ते ११ दरम्यानच या, नाहीतर पासबुक प्रिंट मिळणार नाही,” अशी अरेरावीची भाषा वापरत ग्राहकांना सर्रास हुडकून लावले जात असल्याचा गंभीर आरोप नागरिकांनी केला आहे. ११ वाजेनंतर…

Read More

मुख्य संपदक /अशोक कुम्मरी सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा शेतकऱ्यांकडून रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला झाडांच्या फांद्या, काटेरी झुडपे आणि गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्ते अरुंद झाले आहेत.काही ठिकाणी समोरून येणारे वाहनचालक एकमेकांना स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः दुचाकीस्वार, चारचाकी आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे तातडीने हटवून रस्त्याची हद्द मोकळी करावी, तसेच रस्त्यावरील अतिक्रमणाची पाहणी करून संबंधित विभागाने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.,प्रशासनाने मोठा अपघात होण्याची वाट न पाहता तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची…

Read More

के गणेश /पारशिवनी  कन्हान मध्य प्रदेशातील भोपाल येथुन नागपूरच्या दिशेने वर्धा कडे कत्तलीसाठी ३८ गोवंश जनावरांची अवैध वाहतूक करणाऱ्या कंटेनर ट्रकवर प्राणीन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे कन्हान पोलिसांनी बोर्डा टोलनाक्यावर कारवाई केली. या कारवाईत चार आरोपींना अटक करण्यात आली असून कंटेनरसह एकूण ५४ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईत ३७ गोवंश जिवंत अवस्थेत आढळले, तर एका गोवंशाचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.प्राप्त माहितीनुसार शनिवार, (दि.५)सप्टेंबर २०२६ रोजी मध्य प्रदेशातून कंटेनर क्रमांक HR-38-V-7353 मधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी नागपूरच्या दिशेने नेली जात असल्याची माहिती प्राणीन फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांना मिळाली. माहिती मिळताच प्राणीण फाउंडेशनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या वाहनाने संशयित कंटेनरचा पाठलाग सुरू…

Read More

​वर्धा/अभय बेदमोहता ​वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात आरोग्य व प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका बनावट डॉक्टरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. कोणतीही वैध पदवी किंवा नोंदणी नसताना अवैधपणे क्लिनिक चालवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या या बोगस डॉक्टरला तपास समितीच्या जाळ्यात अडकल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.वर्धमनेरी येथील संतोष भूतडा यांच्या कॉम्प्लेक्समधील ‘साईराम दवाखाना डॉ. रंजन कुमार मंडल यांचे क्लिनिक ​वर दि. ४ सप्टेंबर.रोजी वैध वैद्यकीय पदवी आणि नोंदणीशिवाय वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या या फसवणुकीच्या क्लिनिक चा‌ पर्दाफाश झाला.कारवाईचा तपशीलतहसील आरोग्य अधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीच्या सचिव डॉ. उषा कवरासे यांच्या तक्रारीवरून २७ ऑगस्ट रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत आरोपीच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात…

Read More

 ए बी के न्यूज लाईव्ह  ​सेलु/अभय बेदमोहता  देशाला स्वातंत्र्य मिळून आठ दशके (८० वर्षे) पूर्ण होत‌ आली असली, तरी आजही ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. विकासाच्या वल्गना एका बाजूला सुरू असताना, वर्धा जिल्ह्यातील तब्बल ३३ गावांमध्ये आजवर स्मशानभूमीची सुविधा उपलब्ध झालेली नाही. परिणामी, गावातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यावर त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी ग्रामस्थांना गावाबाहेर मोकळ्या जागेचा किंवा शेतीचा आधार घ्यावा लागत असून, पावसाळा व उन्हाळ्यात या समस्येचे स्वरूप अधिकच भीषण होते.वर्धा जिल्ह्यात एका बाजूला विविध विकास कामांना गती दिली जात असून सरकारी इमारती उभ्या राहत आहेत, मात्र ग्रामपंचायत विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील विविध आठ ही तहसीलमधील ३३…

Read More

सेलू / अभय बेदमोहता सेलू तालुक्यातील सिंदी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकपदावर कार्यरत असलेल्या मुख्तार उर्फ गोलू शेख यांच्या संचालकपदाच्या वैधतेबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. संबंधित संचालक ज्या ग्रामपंचायत मतदारसंघातून बाजार समितीवर प्रतिनिधी म्हणून निवडून आले होते, त्या ग्रामपंचायत क्षेत्रातील त्यांचे प्रतिनिधित्व आता कायम आहे का, याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.या प्रकरणी सुरगाव येथील रहिवासी राजू नत्थुजी भगत यांनी २६ ऑगस्ट २०२६ रोजी वर्धा येथील जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांच्याकडे लेखी तक्रार दाखल केली आहे. संबंधित संचालकाच्या पात्रतेची कायदेशीर तपासणी करून नियमांनुसार योग्य ती कारवाई करण्यात यावी, अशी मागणी तक्रारीत करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, मुख्तार…

Read More

मुख्य संपदक/अशोक कुम्मरी  सिरोंचा : तालुक्यात सध्या डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांची भीती वाढत असताना सिरोंचा ग्रामीण रुग्णालयातील आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील बेडवर वेळेवर चादरी उपलब्ध नसल्याच्या तक्रारी असून, स्वच्छतेकडेही पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांकडून केला जात आहे.गेल्या तीन दिवसांपासून रुग्णालयात उपचारासाठी एकच डॉक्टर उपलब्ध असल्याचे रुग्णांचे म्हणणे आहे. प्रत्यक्षात डॉक्टरांची संख्या तीन-चार असताना इतर डॉक्टर नियमितपणे उपलब्ध का नाहीत, असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.विशेष म्हणजे, सध्या ताप, डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचे रुग्ण वाढण्याची शक्यता असताना रुग्णालयात पुरेसे वैद्यकीय मनुष्यबळ उपलब्ध नसल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. गंभीर रुग्णांना पुढील उपचारासाठी…

Read More

ए बी के न्यूज लाईव्ह  के गणेश /पारशिवनी  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री जयकुमार बन्सोड उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रोशन भोयर, आरोग्य समितीचे विधानसभा प्रमुख श्री शरद वाटकर, परिवहन समितीचे अध्यक्ष श्री गज्जू बल्लारे, मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये व ज्येष्ठ शिक्षिका सौ चित्रलेखा धानफोले उपस्थित होते.यावेळी सर्व मान्यवरांनी माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन शिक्षक दिनाचे महत्व अधोरेखित केले. तद्नंतर दहिहंडीचे पूजन करून दहिहंडी उत्सवाला सुरुवात करण्यात आली. चिमुकल्यांनी राधा – कृष्ण यांची वेशभूषा परिधान केली होती. केंद्रप्रमुख श्री जयकुमार बन्सोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने भेटवस्तू…

Read More

ए बी के न्यूज लाईव्ह  के गणेश /पारशिवनी  कन्हान : भारताचे माजी राष्ट्रपती, महान तत्त्वज्ञ व शिक्षणतज्ज्ञ भारतरत्न डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंतीनिमित्त ५ सप्टेंबर रोजी कन्हान शहर व परिसरातील विविध शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी डॉ. राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शिक्षकांची वेशभूषा करून सहभाग घेतला, तर शिक्षकांचा सत्कार करून त्यांच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.*हिराबाई उच्च प्राथमिक शाळेत शिक्षक दिन उत्साहात*हिराबाई उच्च प्राथमिक शाळा, कन्हान येथे शिक्षक दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नरेंद्र वाघमारे, तर प्रमुख पाहुण्या वंदना रामापुरे, हिराबाई वस्तीगृहाचे…

Read More

आलापल्लीतील शिक्षक डॉ. सखाराम झोडे यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार आलापल्ली:- ( गडचिरोली) : अतिदुर्गम भागातील विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी सातत्याने उपक्रम राबविणारे शिक्षक डॉ. एस. ए. झोडे यांना राज्यस्तरीय कर्तृत्ववान शिक्षक पुरस्कार-२०२६ देऊन गौरविण्यात आले.विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी आणि नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांमुळे डॉ. झोडे यांनी शिक्षण क्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना विज्ञान विषयाची गोडी निर्माण करण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.या शैक्षणिक सत्रात त्यांनी ‘साधे प्रयोग करून विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण करणे’ हा नाविन्यपूर्ण उपक्रम सादर केला. टाकाऊ साहित्याचा वापर करून विद्यार्थ्यांना विविध वैज्ञानिक प्रयोग प्रत्यक्ष व सोप्या पद्धतीने समजावून देण्याचे काम या उपक्रमातून…

Read More