सिरोंचा : सिरोंचा ते आसारअलीकडे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मधोमध मोठा खड्डा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या खड्ड्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत असून, अपघाताचा धोका वाढला आहे.रस्त्याच्या मधोमध पडलेल्या या खड्ड्याची तीव्रता लक्षात घेता काही नागरिकांनी खड्ड्याच्या ठिकाणी झाडांच्या फांद्या व लाकूड टाकून वाहनचालकांना सावध करण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र हा कायमस्वरूपी उपाय नसून संबंधित विभागाने तातडीने खड्डा बुजवून रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी हा खड्डा वाहनचालकांच्या लक्षात न आल्यास दुचाकीस्वारांचा गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात खड्ड्यात पाणी साचल्यास त्याची खोली लक्षात येत नसल्याने धोका आणखी वाढू शकतो. या…

