Author: Ashok Kummari

Ashok Kummari

मुख्य संपादक : अशोक कुम्मरी M.C. Journalism 📞 मो. नं. : 7588302155 / 9356288240

अंकिसा प्रतिनिधी/वेंकटस्वामी चकिनाला सिरोंचा : सिरोंचा तालुक्यातील लक्ष्मीदेवीपेठ ग्रामपंचायतीच्या वार्ड क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या मुघामेत्यम गावातील नागरिकांना आजही पक्क्या रस्त्याअभावी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसाळ्यात गावाकडे जाणारा कच्चा मार्ग चिखलमय होत असल्याने नागरिकांना अक्षरशः गुडघाभर चिखलातून मार्ग काढावा लागत आहे.गावात एखाद्या व्यक्तीची प्रकृती अचानक बिघडल्यास किंवा आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास सर्वाधिक अडचण निर्माण होते. गेल्या महिन्यात एका व्यक्तीची अचानक तब्येत बिघडल्यानंतर रुग्णवाहिकेशी संपर्क करण्यात आला. मात्र, खराब आणि चिखलाने भरलेल्या रस्त्यामुळे चारचाकी वाहन गावापर्यंत पोहोचू शकले नाही. अखेर संबंधित व्यक्तीला बैलगाडीच्या सहाय्याने मुख्य रस्त्यापर्यंत आणण्यात आले. मात्र, तोपर्यंत दुर्दैवी परिस्थिती निर्माण झाल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली.अशाच प्रकारे काही दिवसांपूर्वी…

Read More

सिरोंचा, दि. ८ सप्टेंबर : नाभिक समाजाचे आराध्य दैवत व संत शिरोमणी सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त तालुका नाभिक समाज संघटना, सिरोंचा यांच्या वतीने मंगळवारी दि. ८ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता वॉर्ड क्रमांक ०५, सिरोंचा येथे पुण्यतिथी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी संत सेना महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकत त्यांच्या महान विचारांचे स्मरण केले.भक्ती, सेवा, प्रामाणिकपणा आणि सामाजिक एकता” हा संत सेना महाराजांच्या जीवनाचा मूलमंत्र होता. त्यांनी आपल्या आचरणातून समाजाला कर्तव्यनिष्ठेचा आणि समतेचा संदेश दिला. आजच्या युवा पिढीने संत सेना महाराजांच्या विचारांचा आदर्श घेऊन शिक्षण, सामाजिक एकता…

Read More

ए बी के न्यूज लाईव्ह  ​वर्धा / अभय बेदमोहता ​विदर्भाच्या मातीत संस्कृती आणि परंपरांचे जे इंद्रधनुषी रंग उधळले जातात, त्याची गोष्टच निराली आहे. नागपूरची मारबत आणि पांढुर्णाच्या गोटमारप्रमाणेच वर्धा जिल्ह्यातील सिंदी (रेल्वे) चा ऐतिहासिक ‘ताना पोळा’ हा संपूर्ण विदर्भाचा सर्वात मोठा आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. शतकानुशतके जुनी परंपरा जोपासणारा हा बालगोपाळांचा लाकडी नंदी पोळा आता आपल्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवाकडे (१५० व्या वर्षाकडे) दिमाखात वाटचाल करत आहे. आगामी ११ सप्टेंबरला हा ऐतिहासिक उत्सव एका भव्य आणि विशाल लोकोत्सवा म्हणून मोठ्या हर्षोल्लासामध्ये साजरा केला जाणार आहे.या भव्य पोळ्याची सर्वात मोठी ओळख म्हणजे १९ व्या शतकाच्या सुरुवातीला तयार केलेला जयस्वाल कुटुंबाचा पारंपरिक लाकडी ‘मानाचा…

Read More

सेलु/अभय बेदमोहता  तालुक्यातील सेलडोह येथे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या नावाखाली महिलांकडून पैसे उकळण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. अपात्र महिलांना पुन्हा लाभ मिळवून देण्याचे आमिष दाखवून हा गोरखधंदा सुरू होता, मात्र सतर्क नागरिकांमुळे आणि पोलिसांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.   सोमवार दि. ७ सप्टेंबर चे रात्रीचे सुमारास हा प्रकार उघडकीस आला.गावातील महिलांना रात्रीच्या वेळी एकत्र करून बैठक घेतली जात होती. योजनेतून अपात्र ठरलेल्या महिलांना पुन्हा लाभ मिळवून देण्याचे आश्वासन देऊन प्रत्येक महिलेकडून ५० रुपये घेतले जात होते.मंगेश रंगारी, राहुल लाडीस्कर, चंद्रशेखर शेवडे, सतीश लाडीस्कर आणि कान्हा धोंगडे यांनी महिलांकडे ओळखपत्राची मागणी केली होती.याप्रकरणी मुंबईचा पत्ता असलेली ‘अखिल भारतीय जनवादी महिला…

Read More

सेलु/अभय बेदमोहता,   पोळा सणात सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणताही अपप्रकार घडू नये म्हणून पेट्रोलिंग सुरु असता आज दिनांक 07/09/2026 रोजी पोलीस स्टेशन सेलूचे गुन्हे अन्वेषण पथकाला मुखबीरद्वारे माहिती मिळाली की संदीप ठाकरे रा देवनगर (हिंगणी) हा मौजा जुनेवानी शेत शिवारातील नाल्याच्या काठावर गावठी मोहा दारू ची भट्टी काढण्या करिता मोहा रासायन सडवा तयार करीत आहे.या प्राप्त माहितीनुसार जुनेवानी शेत शिवारात पंचासमक्ष मौक्यावर पोहोचुन पाहणी केली असता संदीप ठाकरे देवनगर हिंगणी हा नाल्या च्या बाजूला झाडाझुडपात मोहा सडवा रसायन तयार करत असताना दिसून आला. त्यास पोलीस व पंच आल्याची चाहूल लागतंच तो झाडाझुडपाचा फायदा घेत मोक्यावरून…

Read More

चंद्रपूर प्रतिनिधी/कैलास दुर्योधन हेडरी–घुग्घुस परिसरातील युवकांना रोजगाराची मागणी…! दि. ८ सप्टेंबर : कोनसरी, हेडरी व घुग्घुस , चंद्रपूर, तडाली परिसरात विविध औद्योगिक प्रकल्पांना वेग येत असताना स्थानिक युवकांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. स्थानिकांच्या जमिनीवर उद्योग उभे राहत असतील, तर त्या उद्योगांमधील रोजगाराचा पहिला हक्क स्थानिक युवकांचा असला पाहिजे, अशी ठाम मागणी शिवसेना श्रमिक राष्ट्रीय कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष योगेश मुऱ्हेकर यांनी उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.औद्योगिक प्रकल्पांमध्ये होणाऱ्या भरती प्रक्रियेत स्थानिक पात्र युवकांना प्राधान्य देण्यात यावे. विशेषतः प्रकल्पग्रस्त व प्रकल्पबाधित कुटुंबांतील युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.केवळ कायमस्वरूपी नोकऱ्यांपुरता स्थानिक रोजगाराचा…

Read More

के गणेश /पारशिवनी  बाह्यवळण मार्गासाठी भूमापनाला शेतकऱ्यांचा तीव्र विरोध; जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत मागण्यांवर सविस्तर चर्चा पारशिवनी पारशिवनी तालुक्यात प्रस्तावित तिसऱ्या बाह्यवळण मार्गासाठी करण्यात येणाऱ्या भूमापनाला शेतकऱ्यांनी तीव्र विरोध केल्यानंतर अखेर प्रशासनाला भूमापनाची प्रक्रिया थांबवून माघारी फिरावे लागले. या पार्श्वभूमीवर शेतकरी संघर्ष समितीच्या शिष्टमंडळासह बाधित शेतकऱ्यांची शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेण्यात आली. बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या विविध मागण्या व चिंता जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्यासमोर मांडल्या.सुमारे १४ हजार कोटी रुपये खर्चाचा आणि १४८ किलोमीटर लांबीचा बाह्यवळण मार्ग प्रस्तावित असून, या प्रकल्पामुळे पारशिवनी तालुक्यातील अनेक गावांतील शेतजमिनी बाधित होणार आहेत. जमीन ही शेतकऱ्यांच्या उदरनिर्वाहाचे प्रमुख साधन असल्याने भूसंपादन प्रक्रियेमुळे आपल्या…

Read More

ए बी के न्यूज लाईव्ह  सेलु/अभय बेदमोहता  ​स्व. गोविंदराव वंजारी व गोविंद मैना फाऊंडेशनच्या वतीने, स्व. लक्ष्मणराव मानकर (गुरूजी) आदिवासी आश्रमशाळा, वडगाव (जंगली), ता. सेलू, जि. वर्धा येथील यशस्वी मुख्याध्यापक मा. श्री. भोंगे सर यांना त्यांच्या ३३ वर्षांच्या निष्ठावान व उल्लेखनीय सेवाकार्याबद्दल प्रतिष्ठित ‘आदर्श मुख्याध्यापक पुरस्कार’ प्रदान करण्यात आला आहे. शिक्षक आमदार मा. श्री. सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या प्रेरणादायी सोहळ्याला शिक्षक आमदार मा. श्री. अभिजीत वंजारी, माजी शिक्षक आमदार मा. श्री. डायगवाणे सर आणि ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. बबनराव तायवाडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती. मान्यवरांच्या हस्ते झालेला हा सन्मान म्हणजे केवळ एका व्यक्तीचा गौरव…

Read More

सिरोंचा :- असरअल्ली पोलीस ठाणे येथे नुकतेच पदभार स्वीकारलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक गोळगे साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बनाय्या जनगम आणि सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी पुष्पगुच्छ प्रदान करून पोलीस निरीक्षक गोळगे साहेब यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.या भेटीदरम्यान असरअल्ली परिसरातील गावांच्या विविध समस्या, नागरिकांनाच्या अडचणी, सार्वजनिक सुरक्षितता तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.गावातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध प्रश्नांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे, तसेच नागरिक आणि पोलीस विभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत…

Read More

ए बी के न्यूज लाईव्ह  ​सेलु/अभय बेदमोहता विद्यार्थ्यांच्या शिक्षणाशी खेळखंडोबा मांडणाऱ्या एसटी महामंडळाच्या मनमानी कारभाराचा फटका तालुक्यातील केळझर ते वर्धा मार्गावरील शेकडों गोरगरीब शाळकरी मुलांना बसत आहे. वर्धा आगाराचे केळझर येथील वाहतूक नियंत्रक गोपाल कुनगटकर हे रोज इमाने एतबारे सकाळी सात वाजता वर्धेहून केळझरला पोहोचतात आणि दररोज विद्यार्थ्यांसाठी बायपासवरून आतमध्ये बस आणण्याचा प्रयत्न करतात. मात्र, सकाळी सातपासून साडेदहा वाजेपर्यंत बायपासवरच थांबावे लागत असून, अनेक बस आगारात किंवा गावात आत येत नसल्याचे उघडकीस आले आहे. ज्या बसेस वेळेवर गावात किंवा आतमध्ये येत नाहीत, त्याबाबत वारंवार तक्रारी करूनही वरिष्ठ अधिकारी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहेत. चालक आणि वाहकांच्या मनमानी कारभारामुळे शेकडो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक…

Read More