ए बी के न्यूज लाईव्ह
के गणेश /पारशिवनी
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी केंद्रप्रमुख श्री जयकुमार बन्सोड उपस्थित होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री रोशन भोयर, आरोग्य समितीचे विधानसभा प्रमुख श्री शरद वाटकर, परिवहन समितीचे अध्यक्ष श्री गज्जू बल्लारे, मुख्याध्यापक श्री खिमेश बढिये व ज्येष्ठ शिक्षिका सौ चित्रलेखा धानफोले उपस्थित होते.यावेळी सर्व मान्यवरांनी माजी राष्ट्रपती डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन शिक्षक दिनाचे महत्व अधोरेखित केले. तद्नंतर दहिहंडीचे पूजन करून दहिहंडी उत्सवाला सुरुवात करण्यात आली. चिमुकल्यांनी राधा – कृष्ण यांची वेशभूषा परिधान केली होती. केंद्रप्रमुख श्री जयकुमार बन्सोड यांनी विद्यार्थ्यांचे कौतुक करीत उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन शिक्षकदिन व जन्माष्टमी साजरी केली.कार्यक्रमाचे संचालन श्री भिमराव शिंदेमेश्राम यांनी तर उपस्थितांचे आभार कु हर्षकला चौधरी यांनी मानले. कार्यक्रमाच्या आयोजनासाठी सौ चित्रलेखा धानफोले, कु लिखिता धांडे, कु अपर्णा बावनकुळे, श्री अमित मेंघरे, श्री भिमराव शिंदेमेश्राम, कु शारदा समरीत, कु प्रीती सुरजबंसी, कु हर्षकला चौधरी, श्री राजू भस्मे, श्रीमती उज्वला कुरूवंशी, सौ सुनिता मनगटे, सौ सुलोचना झाडे, सौ मंदा नंद्देवार यांनी सहकार्य केले.


