वर्धा/अभय बेदमोहता
वर्धा जिल्ह्याच्या आर्वी तालुक्यात आरोग्य व प्रशासनाने नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या एका बनावट डॉक्टरांविरोधात मोठी कारवाई केली आहे. कोणतीही वैध पदवी किंवा नोंदणी नसताना अवैधपणे क्लिनिक चालवून रुग्णांवर उपचार करणाऱ्या या बोगस डॉक्टरला तपास समितीच्या जाळ्यात अडकल्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.वर्धमनेरी येथील संतोष भूतडा यांच्या कॉम्प्लेक्समधील ‘साईराम दवाखाना डॉ. रंजन कुमार मंडल यांचे क्लिनिक वर दि. ४ सप्टेंबर.रोजी वैध वैद्यकीय पदवी आणि नोंदणीशिवाय वैद्यकीय प्रॅक्टिस करणाऱ्या या फसवणुकीच्या क्लिनिक चा पर्दाफाश झाला.कारवाईचा तपशीलतहसील आरोग्य अधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीच्या सचिव डॉ. उषा कवरासे यांच्या तक्रारीवरून २७ ऑगस्ट रोजी झालेल्या समितीच्या बैठकीत आरोपीच्या कागदपत्रांची तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार ४ सप्टेंबर रोजी गटविकास अधिकारी तथा समिती अध्यक्ष शिवशंकर इंगोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. सौदामिनी हरदे, विस्तार अधिकारी (आरोग्य) गोपाल चौधरी आणि औषध निर्माण अधिकारी संदीप वाघ यांनी दोन पंचांच्या उपस्थितीत वर्धमनेरी येथे जाऊन त्या क्लिनिकवर छापा टाकला.तपास आणि गुन्हातपासणीदरम्यान आरोपी रंजनकुमार मंडल याने दाखवलेली प्रमाणपत्रे कोणत्याही मान्यताप्राप्त वैध वैद्यकीय संस्थेची नसल्याचे उघडकीस आले. कोणतीही वैध परवानगी आणि पदवी नसताना रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण केल्याप्रकरणी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अशा प्रकारच्या अवैध हालचालींवर आळा घालण्यासाठी तहसीलस्तरीय बोगस डॉक्टर शोध समितीकडून भविष्यातही कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे सांगण्यात आले आहे.


