Author: Ashok Kummari

Ashok Kummari

मुख्य संपादक : अशोक कुम्मरी M.C. Journalism 📞 मो. नं. : 7588302155 / 9356288240

मुख्य संपदक /अशोक कुम्मरी  सिरोंचा : सिरोंचा–आलापल्ली राष्ट्रीय महामार्ग क्र. 353-C च्या कामाला तब्बल पाच वर्षांचा कालावधी उलटत आला असतानाही महामार्गाचे काम अद्याप पूर्णत्वास गेलेले नाही. कासवगतीने सुरू असलेल्या या कामामुळे नागरिकांचे मोठे हाल होत असून, आता बांधण्यात आलेल्या काँक्रीट रस्त्याला ठिकठिकाणी तडे गेल्याने कामाच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.सिरोंचा तालुका गडचिरोली जिल्ह्याच्या मुख्यालयापासून सुमारे २०० किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे शासकीय कामे, आरोग्य सेवा, शिक्षण, व्यवसाय तसेच इतर अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना याच मार्गावरून प्रवास करावा लागतो. मात्र, महामार्गाचे काम अद्याप मोठ्या प्रमाणात अपूर्ण असल्याने नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.काँक्रीट रस्त्याला बांधकामानंतरच तडे,महामार्गावर काही ठिकाणी सीसी रोडचे…

Read More

ए बी के न्यूज लाईव्ह  गणेश खोब्रागडे | पारशिवनी कन्हान : कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रायनगर परिसरात साप्ताहिक बाजारातून घरी परतणाऱ्या ३८ वर्षीय महिलेच्या गळ्यातील सोन्याची माळ अज्ञात इसमाने जबरदस्तीने हिसकावून पळ काढल्याची घटना शुक्रवारी (दि. ४ सप्टेंबर) रात्री सुमारे ८.४० वाजता घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहप्राप्त माहितीनुसार, सुकेशनी प्रशांत बंसोड (वय ३८), रा. वार्ड क्र. ३, रायनगर, कन्हान, या आपल्या शेजारील महिलेसोबत साप्ताहिक बाजारात गेल्या होत्या. बाजार आटोपून त्या पायी घरी परतत असताना अशोकनगर ते सुरेशनगर मार्गावरील आदर्श शाळेसमोर त्यांच्या मागून एक अनोळखी इसम आलासदर इसमाने निळ्या रंगाची हाफ टी-शर्ट आणि निळ्या रंगाची फुल लोअर पॅन्ट…

Read More

 के गणेश /पारशिवनी  कन्हान : – प्रस्तावित तिसऱ्या बाह्यवळण रस्त्यासाठी बोरी (सिंगोरी) आणि बोरी (राणी) गावातील शेत जमिनींची मोजणी करण्यासाठी प्रशासनाने गुरुवारी मोठा बंदोबस्त तैनात केला होता. मात्र, बाधित शेतकऱ्यांनी तीव्र विरोध करत आंदोलन केल्याने प्रशासनाला भूमापनाची प्रक्रिया सुरू न करताच परतावे लागल प्रस्तावित तिसरा बाह्यवळण रस्ता बुधवार (दि.२) सप्टेंबरला बोरी (सिंगोरी) येथे काही अधिकारी मार्कींग करण्यास आले असता तेथील बाधित शेतक-यांनी आम्हाच्या जमिनी विषयी जो पर्यंत अधिकारी चर्चा करित नाही तोपर्यंत आम्हच्या शेतात पाय ठेवायचा नाही म्हणुन आलेल्या मार्कींग अधिकारी व कर्मचा-यांना परतुन लावले. आज गुरुवार (दि. ३) सप्टेंबर रोजी पारशिवनी तालुक्यातील बोरी (सिंगोरी) आणि बोरी (राणी) गावांमध्ये प्रकल्पासाठी…

Read More

सेलु/अभय बेदमोहता  ​ सेलु नगरपंचायतीने “स्वच्छ आणि सुंदर आमचे सेलु” या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत दोनदा राज्यस्तरीय पुरस्कार पटकावला आहे, मात्र प्रत्यक्षात शहरातील परिस्थिती या दाव्यांच्या अगदी विपरित आहे.सेलु हे तालुक्यातील एक महत्त्वाचे संपन्न जंक्शन मानले जाते, जिथे वर्धा आणि नागपूरकडे जाणारी वर्दळ नेहमीच मोठ्या प्रमाणावर असते.मागील दोन वर्षांत विकासाच्या नावाखाली या शहराची अवस्था अत्यंत भकास झाली असून, सिमेंटच्या रस्त्यांवर आता पायी चालणेही कठीण झाले आहे.यशवंत चौकातील वाढत्या समस्या आणि प्रशासनासाठी ठरलेला येथील अनास्था​फ्लायओव्हर पाडल्याने अडचणीत मोठ्या प्रमाणात वाढ़ झाली आहे.पूर्वी यशवंत चौकात प्रशस्त पूल (फ्लायओव्हर) होता. तो अपघात स्थळ ठरत असल्याच्या कारणावरून सौंदर्यीकरण व सपाटीकरणासाठी पाडण्यात आला, मात्र त्यानंतर नवीन पुल…

Read More

ऐ बी के न्यूज लाईव्ह  के गणेश /पारशिवनी  विशेष प्रशासकीय पथक, पशू रुग्णवाहिका व जेसीबी उपलब्ध करण्याची मागणी कन्हान शहर विकास मंच आणि गौसेवा समिती फाउंडेशन, कन्हान क्षेत्राचे प्रशासनाला निवेदन  कन्हान : – कन्हान, कांद्री, टेकाडी परिसरातील महामार्ग, प्रमुख रस्ते, चौक आणि वर्दळीच्या ठिकाणी मोकाट जनावरांचा वाढता वावर गंभीर समस्या बनला असून, त्यातून सातत्याने गौमातांच्या अपघातांच्या घटना घडत आहेत. या पार्श्वभूमीवर मोकाट जनावरांचा बंदोबस्त करून अपघातांना आळा घालण्यासाठी विशेष प्रशासकीय पथक नियुक्त करावे, पशू रुग्णवाहिका व जेसीबीसह आवश्यक बचाव यंत्रणा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कन्हान शहर विकास मंच आणि गौसेवा समिती फाउंडेशन, कन्हान क्षेत्राच्या वतीने प्रशासनाला दिलेल्या निवेदनातून करण्यात…

Read More

दहेगाव (गो) भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थांची चार ठिकाणी तक्रार दाखल…. सेलु/अभय बेदमोहता सरपंच व ग्रामसेवक निलंबनाच्या उंबरठ्यावर तालुक्यातील दहेगाव (गोसावी) नजिकच्या  मौजा किन्हाळा येथील बोगस खानपट्टा, नाहरकत प्रमाणपत्र व ग्रामपंचायत दहेगाव (गोसावी) मधील भ्रष्टाचार प्रकरणी आज समस्त ग्रामस्थांनी जिल्ह्याचे चारही वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वर्धा, जिल्हाधिकारी वर्धा, जिल्हा खनिकर्म अधिकारी वर्धा आणि गटविकास अधिकारी सेलू* या चारही कार्यालयात तक्रार अर्जावर *दि. 01/09/2026 रोजी आवक शिक्का* घेण्यात आला आहे. (आवक प्रत सोबत जोडली आहे) *ग्रामस्थांचा आरोप असा आहे की -* मौजा किन्हाळा स.नं. 26/1/2 वरील खानपट्ट्यासाठी ग्रामसभेचा ठराव बंधनकारक असताना, सरपंच व ग्रामसेवक यांनी दि.…

Read More

​वर्धा/अभय बेदमोहता      ज्या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वदेशी कपड्यांची होली जाळली होती, ती ऐतिहासिक जागा वर्धा नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आजही उपेक्षित आहे. नुकत्याच झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत ‘टिळक पुतळा’ हा विषय चांगलाच गाजला होता. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे तत्कालीन बांधकाम सभापती उमेदवार रिंगणात होते, परंतु त्यांचा पराभव झाला. आता पराभवानंतर “टिळक पुतळ्याचे काय झाले?” असा सवाल नागरिक विचारत असून, त्यावर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.मागील २० वर्षांतील स्थिती आणि दुर्लक्षवर्धेतील गोलबाजार परिसर प्रसिद्ध असून, येथे जाजोदिया यांनी बागेसाठी नगरपालिकेला जागा दान दिली होती. याच परिसरात लो. टिळकांनी स्वदेशी कपड्यांची होली केली होती. ती भेट वर्धेकरांच्या स्मरणात राहावी म्हणून…

Read More

अंकिसा प्रतिनिधी/ वेंकस्वामी चकिनला  सिरोंचा तालुक्यातील चिंतारेवला ग्रामपंचायत अंतर्गत झोडापल्ली ते पाणीचे टाकी पर्यंत मार्गाची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली आहे. या मार्गावरील काँक्रेट रस्ता पूर्णपणे उखडला असून अनेक ठिकाणी गिट्टी बाहेर आली आहे. त्यामुळे वाहनचालकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत असून शाळकरी विद्यार्थ्यांनाही या रस्त्यावरून ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.तसेच जोडापेल्ली परिसरातील पाणी टाकीजवळ पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचून राहत आहे. रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने जोड्यागुडम गावात जाण्यासाठी रस्ताच बंद झाल्यासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे. नागरिकांना या पाण्यातूनच मार्ग काढत गावात जावे लागत आहे.पाणी टाकीजवळ साचलेले पाणी रस्त्यावरून वाहून जाण्याऐवजी परिसरातच साचून राहत असल्याने नागरिकांच्या अडचणीत आणखी वाढ…

Read More

सिरोंचा : सामुदायिक वनहक्क (CFR) क्षेत्रातील ग्रामसभेच्या कामकाजात वनविभागाने हस्तक्षेप करू नये, तसेच ग्रामसभेच्या अधिकारांवर अतिक्रमण होईल अशा प्रकारे कोणताही दबाव अथवा जबरदस्ती करू नये, अशी ठाम भूमिका येडचिली ग्रामसभेने घेतली आहे. याबाबत ग्रामसभेच्या वतीने सिरोंचा तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.हे निवेदन नायब तहसीलदार हलामी साहेब यांनी स्वीकारले.ग्रामसभेने दिलेल्या निवेदनात सामुदायिक वनहक्क (CFR) क्षेत्रातील मंजूर शासकीय रोपवनाचे काम ग्रामसभेच्या माध्यमातून व स्थानिक ग्रामस्थांच्या सहभागाने करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. रोपवनासाठी कोणती प्रजाती निवडायची, कोणत्या ठिकाणी लागवड करायची, तसेच संरक्षण व देखभाल कशी करायची, याबाबत ग्रामसभा आणि सामुदायिक वनहक्क समितीचा सहभाग असणे आवश्यक असल्याचे ग्रामसभेने स्पष्ट केले आहे.वनहक्क कायदा…

Read More