Author: Ashok Kummari

Ashok Kummari

मुख्य संपादक : अशोक कुम्मरी M.C. Journalism 📞 मो. नं. : 7588302155 / 9356288240

ए बी के  न्यूज लाईव्ह के गणेश /पारशिवकेनी  कन्हान : – भारत सरकार २०२६ च्या जनगणनेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची स्वतंत्रपणे गणना करून जनगणना पत्रिकेत ‘ओबीसी’साठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेच्या कन्हान शहर शाखे च्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना देण्यात आले. बुधवारी (ता.१६) सप्टेंबर ला श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा संस्था पक अनिल विठोबा बजाईत यांच्या नेतृत्वात युवा आघाडी विदर्भ महासचिव तथा कन्हान शहर अध्यक्ष सुनील सरोदे आणि नागपुर जिल्हा संपर्क प्रमुख सूर्यभान चकोले यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले. ओबीसी…

Read More

नागभीड : नागभीड शहरातील बिक्केवार चौक येथे नगरपरिषदेच्या माध्यमातून अवघ्या महिनाभरापूर्वी उभारण्यात आलेला सोलर प्रकल्प अचानक कोसळल्याची घटना घडली. सोलर पॅनल, पाण्याची टाकी आणि लोखंडी स्ट्रक्चर खाली कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, नागरिकांची वर्दळ असलेल्या ठिकाणी ही घटना घडल्याने मोठी दुर्घटना टळल्याची चर्चा आहे.

Read More

ए बी के न्यूज लाईव्ह के गणेश /पारशिवनी  कन्हान- सुपर टाऊन परिसरातील हौसालाल पुंड यांच्या घरालगतच्या गोठ्यातून अज्ञात चोरट्याने पाच बकऱ्या चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. चोरीला गेलेल्या बकऱ्यांची अंदाजे किंमत एक लाख रुपये असून, या घटनेमुळे वृद्ध पुंड दाम्पत्यासमोर उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कन्हान पोलिसांनी तक्रार नोंदवून तपास सुरू केला आहे.हौसालाल पुंड हे पत्नीसमवेत सुपर टाऊन परिसरात राहतात. बकऱ्या पाळून व चारून मिळणाऱ्या उत्पन्नावर त्यांचा संसार सुरू होता. त्यांचा मुलगा कळमेश्वर येथे पत्नीसमवेत राहतो. त्यामुळे वृद्ध दाम्पत्याच्या उदरनिर्वाहासाठी बकऱ्यांचे उत्पन्न महत्त्वाचे होते. मात्र, गोठ्यातील पाच बकऱ्या चोरीला गेल्याने त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक आधारालाच धक्का बसला आहे.बकऱ्या चोरीला गेल्याचे…

Read More

ए बी  न्यूज लाईव्ह  सेलु/अभय बेदमोहकेता  नागपूर-वर्धा रोडवरील सेलडोह मार्गावर रस्त्यावरील खड्डे सिमेंट किंवा डांबराऐवजी साध्या मातीने भरण्यात आल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रस्त्याच्या देखभालीचे कंत्राट असलेल्या दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या या ढिसाळ कारभाराविरोधात स्थानिक नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. नागपूर-वर्धा महामार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना टोल नाक्यावर नियमितपणे पैसे मोजावे लागतात. मात्र, बदल्यात योग्य सुविधा आणि दर्जेदार रस्ते मिळण्याबाबत दुर्लक्ष होत आहे.रस्त्यावरील जीवघेणे खड्डे सिमेंट किंवा दर्जेदार डांबरी मटेरियलने भरण्याऐवजी कंपनीने त्यात अक्षरशः माती टाकून खड्डे बुजवले आहेत.पावसामुळे ही माती पूर्णपणे एका दणक्या पाण्याने वाहून जाणार असून खड्डे पुन्हा जैसे थे होणार आहेत, याचे साधे भानही कंत्राटदार कंपनीला राहिलेले…

Read More

ए बी के न्यूज लाईव्ह  प्रतिनिधी देवेंद्रकुमार रंगुवार  पोळा सण व गणेशोत्सवाच्या काळात लाकडाची मागणी वाढण्याची तसेच प्राण्यांची शिकार होण्याची शक्यता लक्षात घेता, सिरोंचा वनविभाचे उपवनसंरक्षक एस. नवकिशोर रेड्डी यांनी सर्व परिक्षेत्र अधिकारी, वनपाल व वनरक्षकांना सतर्क राहून २४ तास विशेष गस्त वाढविण्याचे कडक आदेश दिले आहेत. या आदेशांनुसार वन विभागाने आपली गस्त आणि शोधमोहीम तीव्र केली असून, यादरम्यान असरल्ली वनपरिक्षेत्राच्या पथकाने गुप्त माहितीच्या आधारे धडक कारवाई करत इंद्रावती नदीच्या पात्रात लपवून ठेवलेला सागवान लाकडांचा साठा जप्त केला व तस्करांचा मोठा डाव उधळून लावला आहे.सध्या  पोळा व गणेश उत्सवानिमित आलेल्या सुट्ट्यांच्या काळात अनेक कर्मचारी सुट्टीवर जातात. परंतु, अशा काळातही आपल्या…

Read More

जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सेंद्री/ बूज येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड करण्याकरिता पालक सभा मा.श्री.विनोदजी बागडे माजी उपसभापती पं स पवनी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सौ. दिपीका कोरे सरपंच, श्री श्रीपत मरघडे उपसरपंच , सौ. ज्योती वैद्य पोलीसपाटील, श्री बापुलाल थेर त. मु स.अध्यक्ष त्याचप्रमाणे श्री.बावनकर सर मुख्याध्यापक, श्री कावरे सर, कु. प्रिती कोचे मॅडम, श्री.हेमने सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती ची *बिनविरोध* निवड करण्यात आली.iया मध्ये सौ. दीपाली रामप्रसाद चोपकर यांची अध्यक्ष तसेच श्री विशाल देवराम तुपटे यांची उपाध्यक्ष तसेच श्री उमेश चोपकर, श्री सुधीर शेंडे श्री चंद्रकांत शहारे, श्री.संजय मोहनकर, सौ सीमा पाऊलझगडे , सौ.…

Read More

ए बी के न्यूज लाईव्ह  ​सेलू /अभय बेदमोहता   तालुक्यातील रायपूर (जंगली) येथील भगवान धुर्वे यांच्या मृत्यूनंतर निर्माण झालेला ऐतिहासिक आणि संवेदनशील वाद आता टोकाला पोहोचला आहे. मृत्यूनंतर तब्बल सहा दिवस (१२० तास) उलटले तरी न्याय मिळेपर्यंत अंत्यविधी न करण्याच्या भूमिकेवर धुर्वे कुटुंब आणि ग्रामस्थ अजूनही ठाम आहेत. मृतदेह अजूनही सेलु ग्रामीण रुग्णालयाच्या शवागारात पडून असून, महाराष्ट्राच्या इतिहासातील ही अत्यंत दुर्दैवी आणि पहिलीच घटना मानली जात आहे. या प्रकरणी प्रशासनाच्या भूमिकेवर तीव्र संताप व्यक्त होत असून, खासदार अमर काळे यांनी न्याय मिळवून देण्यासाठी मैदानात उतरल्याने हा संघर्ष आता अधिकच तीव्र झाला आहे.मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीस कायमस्वरूपी सरकारी नोकरी आणि २५ लाख…

Read More

ए बी के न्यूज लाईव्ह  ​सेलू/अभय बेदमोहता.  कुटुंबाच्या तोंडाशी आलेला घास हिरावून नेणाऱ्या आणि मन हेलावून टाकणाऱ्या एका दुर्दैवी घटनेत, सासराच्या शेतात पिकांच्या संरक्षणासाठी तार टाकण्याचे काम करत असलेल्या ३२ वर्षीय जावयाचा महावितरणच्या जिवंत वीज वाहिनीची तार अंगावर पडून जागीच मृत्यू झाला. हिंगणी येथील शेतकरी चंद्रभानजी मुडे यांच्या जुनेवाणी मौजेतील शेतात आज, रविवार दि. १३ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास ही काळीज पिळवटून टाकणारी दुर्घटना घडली. महेश टापरे (वय ३२, रा. हिंगणी) असे मृत जावयाचे नाव आहे.आज दि.१३ सप्टेंबर रविवार चे दुपारची वेळ होती. तेव्हा चंद्रभानजी मुडे यांच्या शेतात कुटुंबातील इतर सदस्यही उपस्थित होते. याच वेळी त्यांचा जावई महेश…

Read More

ए बी के न्यूज लाईव्ह  ​सेलू /अभय बेदमोहता तालुक्यातील ​रायपुर (जंगली) येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेला तब्बल बावन तास उलटून गेले तरीही मृत परिवाराला न्याय मिळालेला नाही. या तीव्र संतापजनक प्रकारामुळे ग्रामस्थांचा संयम सुटला असून, मृतदेह अद्यापही ग्रामीण रुग्णालय सेलू येथील मर्च्युरी कक्षातच पडून आहे. प्रशासनाच्या या असंवेदनशील भूमिकेविरोधात ग्रामस्थांनी थेट वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मृतदेह ठेवून जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत मागे हटणार नाही, असा एल्गार पुकारला आहे.या संपूर्ण गंभीर प्रकरणात प्रशासनाचा ढिसाळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. स्वतः जिल्हाधिकारी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी घटनेच्या इतक्या तासानंतरही पीडित कुटुंबाची साधी भेट घेण्याचे सौजन्य दाखवलेले नाही. यासाठी लोकप्रतिनिधी आणि जबाबदार अधिकाऱ्यांच्या या तोंडावर…

Read More