ए बी के न्यूज लाईव्ह सेलू/अभय बेदमोहता ग्रामीण भागात आणि यात्रा-उत्सवांच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सणासुदीच्या किंवा जत्रेच्या गर्दीचा फायदा घेऊन ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार घडत असून, सिंदी रेल्वे बस स्टॅण्ड परिसरात घडलेल्या एका प्रकाराने यावर पुन्हा प्रकाश टाकला आहे.स्थानिक श्री गजानन महाराज मंदिराच्या परिसरात रात्री उशिरा येणाऱ्या भक्तांसाठी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून रात्री १० ते १२ च्या दरम्यानही भक्त निवासात निःशुल्क आणि पोटभर नाश्ता मिळण्याची उत्तम व्यवस्था असते. मात्र, या आध्यात्मिक आणि सेवाभावी वातावरणाच्या अगदी उलट प्रकार कालच्या येथील विदर्भातील नावाजलेल्या ‘नंदी पोळ्या’च्या सणानिमित्त भरलेल्या बाजारात पाहायला मिळाला.काल नंदी पोळ्याच्या निमित्ताने सिंदी रेल्वे…
Author: Ashok Kummari
ए बी के न्यूज लाईव्ह सेलू/अभय बेदमोहता महाराष्ट्राची संस्कृती आणि उत्सवांची परंपरा संपूर्ण जगात अनोखी आहे. यातही सार्वजनिक गणेशोत्सवाचे स्थान अढळ आहे. विदर्भातील ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेल्या सेलू शहरात ‘एक गाव, एक गणपती’ ही गौरवशाली परंपरा जोपासणाऱ्या येथील प्रसिद्ध सेलुचा राजा बारभाई गणेश मंडळ यावर्षी आपल्या स्थापनेचे १२७ वे वर्ष मोठ्या उत्साहात आणि दिमाखात साजरी करत आहे. या ऐतिहासिक महोत्सवा निमित्त संपूर्ण शहरात आनंदाचे आणि भक्तीमय वातावरण पसरले आहे.भक्तांच्या सोयीसाठी आणि धार्मिक विधींच्या सुयोग्य नियोजनासाठी मंडळाने यंदाच्या कालावधीत विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे.स्थापना दि. १४ सप्टेंबर २०२६ रोजी होणार आहे.आरती व लंगर (महाप्रसाद) दि. १४ ते २५ सप्टेंबर २०२६…
ए बी के न्यूज लाईव्ह सेलु/अभय बेदमोहता सकाळच्या आल्हाददायक वातावरणात आरोग्याची काळजी घेण्यासाठी म्हणून सिंदी रेल्वे नगर परिषदेच्या स्टेडियमवर पाऊल ठेवले, तर एक विदारक वास्तव डोळ्यांसमोर उभे ठाकते. मॉर्निंग वाॅकसाठी असलेल्या या हक्काच्या मैदानावर दारूच्या रिकाम्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या आणि सिगारेटचे थूत्कार विखुरलेले दिसतात. आजचे आपले स्थानिक मैदान आणि आपली व्यवस्था कोणत्या दिशेने जात आहे, याचे हे उत्तम प्रात्यक्षिक म्हणावे लागेल काय?असा प्रश्न सामाजिक कार्यकर्ता सुधाकरराव वाघमारे यांचे कडून विचारल्या जात आहे. या दुर्दैवी वास्तवाच्या बरोबर उलट बाजूला, याच गावातील दुसरी बाजू अंगावर काटा आणणारी आहे. एका बाजूला अंधश्रद्धा आणि भक्तीच्या ओघात भान हरपून गेलेले तरुण पुढील भविष्याची स्वप्ने रंगवत…
ए बी के न्यूज लाईव्ह सेलु/अभय बेदमोहता श्री संत नानाजी महाराज तान्हा पोळा उत्सव समिती,गुरगाव चे वतीने व सर्वांच्या सहकाऱ्यांने सलग विसाव्या वर्षी स्थानिक ग्राम पंचायत कार्यालयासमोर तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मंचकावर हभप नारायणराव पाटील,सुरेंद्र वानखेडे माजी ग्रामपंचायत सदस्य,नारायणराव वानखेडे उपाध्यक्ष सेवा सहकारी संस्था तसेच राजूभाऊ बांते हजर होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संतश्रेष्ठ श्री संत नानाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व नंदीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गावांमधून नंदीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या पोळ्यात जवळपास 250 नंदी सहभागी झाले होते. त्यातून उत्कृष्ट नंदी व उत्कृष्ट वेशभूषा याकरिता स्वर्गीय समीर धांदे…
ए बी के न्यूज लाईव्ह वर्धा/अभय बेदमोहता कृषी विभागाचा प्रस्तावित अतांत्रिक आकृतीबंध तातडीने रद्द करावा या प्रमुख मागणीसाठी राज्यभरातील कृषी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून ११ सप्टेंबर रोजी राज्यभरातील सुमारे १३ हजारांहून अधिक शासकीय लॅपटॉप कार्यालयात जमा करण्यात आले असून, वर्धा जिल्ह्यातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनीही यात सक्रिय सहभाग नोंदवत सर्व प्रकारच्या ऑनलाइन आणि डिजिटल कामकाजावर पूर्णपणे बहिष्कार टाकला आहे.जवळपास १३ हजारहून अधिक लॅपटॉप जमा केल्यामुळे शेतकऱ्यांच्या ऑनलाइन नोंदी, योजनांची अंमलबजावणी, पीकविषयक कामकाज आणि शासकीय अहवाल यांसारख्या महत्त्वाच्या सेवा ठप्प झाल्या आहेत.याबाबत १० सप्टेंबर रोजी गुणनियंत्रण संचालक सुनील बोरकर आणि फलोत्पादन संचालक जीवनराव बुंदे यांच्यासोबत…
ए बी के न्यूज लाईव्ह वर्धा/अभय बेदमोहता आनंदाच्या आणि उत्सावाच्या सणासुदीच्या वातावरणात वर्धा जिल्ह्यातील विरुळ आखाजी येथे मुलगा प्रणय चौधरी याने आपल्या जन्मदात्या वडील परमेश्वर चौधरी यांची वीट मारुन हत्त्या केल्याची हादरवून टाकणारी घटना घडली आहे. तान्ह्या पोळ्यासारख्या सणाच्या दिवशीच कौटुंबिक वादातून मुलाने आपल्या जन्मदात्या पित्याचा खून केल्याची संतापजनक घटना शुक्रवारी (दि. ११ सप्टेंबर) दुपारी घडली. विरुळ येथे घडलेल्या या थरारामुळे संपूर्ण परिसरात एकच खळबळ उडाली असून, सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे. मृतक परमेश्वर चौधरी आणि त्यांच्या पत्नीमध्ये वाद असल्याने पत्नी मुलगा प्रणय व मुलीसह रसुलाबाद येथे वेगळी राहत होती. परमेश्वर यांना यापूर्वी एका खुनी प्रकरणात शिक्षा झाली होती, जी…
ए बी के न्यूज लाईव्ह सेलु/अभय बेदमोहता अन्नदाता शेतकऱ्याचा खरा सखा आणि कष्टाचा सोबती असलेल्या सर्जा राजाचा प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सेलू शहरात बैलपोळा सण अत्यंत उत्साहात व पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि जल्लोषात साजरा करण्यात आला. आज सेलू शहरात शेतकरी बांधवांनी आपल्या लाडक्या बैलजोड्यांना अत्यंत आकर्षक पद्धतीने नटवून आणि सजवून पोळ्यात आणले होते. रंगीबेरंगी झुला, विविध आकर्षक अलंकार आणि सुंदर सजावटीने नटलेल्या बैलजोड्या पाहण्यासाठी महिला, लहान मुले व नागरिकांची मोठी गर्दी उसळली होती. ढोल-ताशांच्या निनादात संपूर्ण बाजार परिसर दुमदुमून गेला होता.तर महादेवाच्या गाण्यांच्या निनादामुळे व शेतकरी बांधवांच्या उत्साहपूर्ण वातावरणाने वेगळेच वातावरणाची प्रचिती येत होती. पोळ्यानिमित्त बाजार परिसरात आज विविध खेळणी,…
ए बी के न्यूज लाईव्ह राष्ट्रीय महामार्ग क्र. ६३ वरील सिरोंचा ते पातागुडम या मार्गाच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात झाडे, सागवानाची झाडे, झुडपे व वेली रस्त्याच्या अगदी कडेला वाढलेल्या आहेत. त्यामुळे या मार्गावरून दररोज प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.विशेषतः तुमनूर ते वडधम परिसरात अनेक वळणाचे मार्ग आहेत. या वळणांच्या ठिकाणी रस्त्याच्या अगदी कडेला वाढलेली झाडे-झुडपे समोरून येणारी वाहने स्पष्टपणे दिसू देत नाहीत. परिणामी अचानक समोरून वाहन आल्यास वाहनचालकाला प्रतिक्रिया देण्यासाठी पुरेसा वेळ मिळत नाही.या मार्गावर मोठ्या प्रमाणात जड वाहतूक सुरू असते. मोठमोठे ट्रक, मालवाहू वाहने व इतर अवजड वाहने या मार्गाने नियमितपणे ये-जा करतात. अशा वेळी दुचाकीस्वार…
ए बी के न्युज लाईव्ह /सेलु/अभय बेदमोहता तालुक्यातील रायपूर जंगली येथे वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. या मानवी हल्यामुळे संपूर्ण गावात प्रचंड संताप आणि शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी केलेल्या तीव्र विरोधामुळे प्रशासनाला रात्री उशिरा बारा वाजेपर्यंत संघर्ष करावा लागला.तर यंदाच्या पोळा सणावरही या दुर्घटनेचे सावट असून गावकऱ्यांनी बैलजोड्या घरीच बांधून ठेवत यंदाचा बैलपोळा न करण्याचा एकमुखी निर्णय घेतला आहे. घटना घडल्यानंतर संतप्त ग्रामस्थांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना घटनास्थळीच घेराव घातला होता. जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत, तोपर्यंत मृतदेह हलवू देणार नाही, अशी ठाम भूमिका गावकऱ्यांनी घेतली. अखेर वरिष्ठांकडे मागण्या पोहोचवण्याचे आश्वासन दिल्यानंतर रात्री साधारण बारा वाजताच्या सुमारास…
ए बी के न्यूज लाईव्ह सेलु/अभय बेदमोहता सेलू तालुक्यांतर्गत येणाऱ्या रायपूर जंगली परिसरात वाघाच्या हल्ल्यात एका ६५ वर्षीय शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाल्याची अत्यंत दुर्दैवी घटना आज बुधवार, दिनांक ९ रोजी सायंकाळचे ४ वाजताच्या सुमारास घडली. भगवान धुर्वे असे मृत शेतकऱ्याचे नाव असून, ते शेतातून काम आटोपून आपल्या घरी परतत असताना गावाजवळच दबा धरून बसलेल्या वाघाने त्यांच्यावर अचानक प्राणघातक हल्ला केला. या मानवीहल्ल्यामुळे संपूर्ण परिसरात तीव्र शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या परिसरामध्ये गेल्या काही काळापासून वन्यप्राण्यांचा, विशेषतः वाघांचा वावर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. जंगलाच्या लगत असणारी शेती आणि मानवी वस्तीत वन्यजीवांचा वावर वाढल्यामुळे शेतकऱ्यांना जीव…

