Author: Ashok Kummari

Ashok Kummari

मुख्य संपादक : अशोक कुम्मरी M.C. Journalism 📞 मो. नं. : 7588302155 / 9356288240

वेंकटस्वामी चकिनाला /अंकिसा प्रतिनिधी  सिरोंचा तालुक्यातील मौजा रंगधामपेठा चक येथील शेतकऱ्यांच्या शेताकडे जाणारा शासकीय शेतरस्ता अनेक वर्षांपासून अतिक्रमित असल्याने तो पूर्णपणे मोकळा करून देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी २४ ऑगस्ट रोजी तहसीलदार तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी, सिरोंचा यांच्याकडे निवेदन सादर केले.निवेदनानुसार, सदर शासकीय शेतरस्ता महसूल अभिलेख व गाव नकाशामध्ये नमूद असतानाही प्रत्यक्ष वापरासाठी उपलब्ध नसल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी अडचणी निर्माण होत असून शेतीची मशागत, पेरणी, कापणी तसेच धान्य व शेतीमालाची वाहतूक करण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे.रस्ता बंद असल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बांध तुटणे, नुकसान होणे तसेच जनावरांच्या वाहतुकीसाठीही अडचणी निर्माण होत…

Read More

सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मुलकला यांच्या कार्याची प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडून प्रशंसा गडचिरोली  राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) यांच्या वतीने गडचिरोली येथे भव्य कार्यकर्ता मेळावा उत्साहात पार पडला. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, माजी मंत्री अनिल देशमुख, निरीक्षक बोरकुटे तसेच जिल्हाध्यक्ष अतुल गण्यारपवार यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्यात आगामी काळात पक्षाचे संघटन अधिक मजबूत करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी जनतेच्या प्रश्नांवर सक्रियपणे काम करून पक्षाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवावी, तसेच संघटन वाढीसाठी जोमाने काम करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे व उपस्थित मान्यवरांनी केले. सिरोंचा तालुकाध्यक्ष सागर मुलकला यांच्या कार्याचे विशेष कौतुक या…

Read More

गणेश खोब्रागडे /पारशिवनी ठिकठिकाणी उत्स्फूर्त स्वागत; शहरात घुमला एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश कन्हान  पैगंबर हजरत मोहम्मद साहेब यांच्या विलादत अर्थात जन्मदिनाच्या स्मरणार्थ साजऱ्या होणाऱ्या पवित्र ईद मिलादुन्नबी निमित्त कन्हान शहरात सुन्नी रजा मस्जिदच्या वतीने भव्य जुलूस काढण्यात आला. उत्साह, श्रद्धा आणि आनंदाच्या वातावरणात निघालेल्या या जुलूसमधून शहरात एकता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आला.जुलूसची सुरुवात सुन्नी रजा मस्जिद येथून झाली. त्यानंतर जुलूस पिपरी मार्गे आंबेडकर चौक येथे पोहोचला. पुढे महामार्गावरून तारसा चौक, सात नंबर नाका, गांधी चौक मार्गे पुन्हा सुन्नी रजा मस्जिद येथे जुलूसचा समारोप करण्यात आला. या जुलूसमध्ये मुस्लिम समाजातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.…

Read More

सेलु/अभय बेदमोहता  स्मशानभूमीच्या रस्त्यावरून मृतदेहासोबत आज ग्रामस्थांना करावी लागली संघर्षमय पायपीट ​”जगावे तर मानवी हक्कांसाठी, पण मरावं कुणासाठी?” हा संतप्त सवाल आज सेलु तालुक्यातील सेलडोह नजिकच्या बोरगावच्या दुर्दैवी परिस्थितीने पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. स्वातंत्र्याची ७८ वर्षे उलटूनही विकासाचा सूर्य न उगवलेल्या या गावाला अखेरच्या प्रवासातही ‘वनवासाची’च किंमत मोजावी लागली. स्मशानभूमीकडे जाणारा हक्काचा रस्ताच नसल्यामुळे, मृतदेह खांद्यावर घेऊन गेलेल्या प्रियजनांना शेतशिवाराच्या पायवाटेवरच अडवणुकीचा सामना करावा लागला. प्रशासनाच्या दिरंगाईमुळे एका ३५ वर्षीय तरुणाच्या अंत्यसंस्कारासाठी गावकऱ्यांना अक्षरशः संघर्ष करावा लागल्याने संताप व्यक्त होत आहे. ​तालुक्यातील हेलोडी गट ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या बोरगाव येथे दि.२६ ऑगष्ट बुधवार रोजी विजय अशोक धूर्वे (वय ३५) यांचे दुर्दैवी…

Read More

अंकिसा प्रतिनिधी : देवेंद्र कुमार रंगुवार अंकिसा – सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्रातील सर्कल क्रमांक ४९३, ५८० व ३१६, गाव-गोलागुडम मालमधील वनजमिनींसंदर्भात अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) कायदा, २००६ अंतर्गत प्रलंबित दावे व अर्जांची पडताळणी प्रक्रिया सुरू आहे. मात्र या प्रक्रियेबाबत काही नागरिक व ग्रामीण भागात गैरसमज निर्माण झाल्याचे वनविभागाच्या निदर्शनास आले आहे.वनविभागाने स्पष्ट केले आहे की, कोणत्याही प्रकारच्या नवीन वनजमिनीचे वाटप अथवा नवीन पट्टे देण्याची प्रक्रिया सुरू नाही. सध्या सुरू असलेली प्रक्रिया ही केवळ १३ डिसेंबर २००५ पूर्वीपासून पात्र आदिवासी व इतर पारंपरिक वननिवासी बांधवांच्या वनजमिनीवरील अतिक्रमणासंदर्भातील कायदेशीर दाव्यांची छाननी व पडताळणी करण्यापुरती मर्यादित आहे.या दाव्यांची पडताळणी…

Read More

​सेलु/अभय बेदमोहता ईद-उल-फित्र निमित्त सेलु शहर तसेच नजीकच्या प्रतीपंढरी घोराड येथे उत्साहाचे व आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. विविध समाजांच्या सहभागातून या सणादरम्यान सामाजिक एकोपा आणि बंधुभावाचे अनोखे दर्शन घडले. ​सकाळी घोराड येथे मुस्लिम बांधवांकडून एका भव्य मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले होते. ही मिरवणूक श्री संत केजाजी महाराज मंदिराजवळ पोहोचल्यानंतर, बशीरभाई शेख व त्यांच्या परिवाराच्या वतीने मिरवणुकीत सहभागी बांधवांना दूध, चहा व केळीचे वाटप करून त्यांचे स्वागत करण्यात आले. ​सेलु शहरात विविध घटकांकडून ​घोराडहून निघालेली मिरवणूक सेलुमधील विकास चौकात पोहोचली. येथे कलीम शेख यांच्या वतीने पोहे, मटकी उसळ (मोट) व शरबतचे वाटप करण्यात आले. तसेच ‘नवचैतन्य बौद्ध कमिटी’ सेलुच्या वतीने गोड…

Read More

गणेश खोब्रागडे /पारशिवनी कन्हान : शहरातील शिहोरा, प्रभाग क्रमांक ३ मधील शाळा व खेळाच्या मैदानासाठी आरक्षित असलेली जागा विकास आराखड्यातून मुक्त/आरक्षणमुक्त करण्यात आली असल्यास त्यास तीव्र विरोध दर्शवत नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधले आहे.या संदर्भात जिल्हाधिकारी, नागपूर तसेच कन्हान नगरपरिषदेचे मुख्याधिकारी (C.O.) यांना निवेदन देण्यात आले. प्रभाग क्रमांक ३ चे नगरसेवक समशेर पुरवले यांच्या माध्यमातून हे निवेदन सादर करण्यात आले. शाळेसाठी तसेच मुलांच्या खेळाच्या मैदानासाठी राखीव जागेचे आरक्षण कायम ठेवण्यात यावे, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.मुलांच्या शिक्षणासाठी शाळा आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी खेळाचे मैदान ही मूलभूत गरज आहे. त्यामुळे अशा सार्वजनिक उपयोगाच्या जागेचे आरक्षण हटवून त्याचा इतर कारणांसाठी वापर करण्यास…

Read More

सिरोंचा :- पेंटीपाका येथे अज्ञात व्यक्तीने एका दुचाकीला आग लावल्याची घटना आज, २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. या आगीत दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहन जवळपास पूर्णपणे जळून खाक झाले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लावण्यात आली, तसेच या घटनेमागे कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून पोलीस प्रशासनाने घटनेची चौकशी करून दोषी व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

Read More

गुमुलांकोंडा ग्रामीण प्रतिनिधी/रमेश सप्पीडी सिरोंचा : गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील सोमनूर (जुने) येथे अंगणवाडीला लागून असलेले सुमारे ४०० वर्षे जुने भलेमोठे चिंचेचे झाड मंगळवारी सायंकाळी ६ वाजताच्या सुमारास अचानक कोसळले. या घटनेत मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.गाव वाच्या मध्यभागी असलेल्या या ऐतिहासिक झाडाला गावकऱ्यांच्या भावनिक आठवणी जोडलेल्या होत्या. चार पिढ्यांपासून या झाडाची सावली आणि आधार गावाला लाभला होता. झाडाखाली पंचायतच्या बैठका तसेच गावातील विविध विषयांवर चर्चा होत असत.झाड कोसळल्याने अंगणवाडीसमोरील बोअरिंग व हँडपंपचे नुकसान झाले आहे. तसेच असरअल्लीकडून सोमनूरकडे येणारी मुख्य वीजवाहिनी झाडावर पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला असून वीजतारा जमिनीवर आल्या आहेत.मोठा अनर्थ टळला,घटना घडली त्यावेळी…

Read More

सेलू /अभय बेदमोहता प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्या वतीने दादी प्रकाशमणि यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ देशभरातील सेवाकेंद्रांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान महाअभियानांतर्गत सेलू येथे मंगळवारी (२५ ऑगस्ट) रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. ब्रह्माकुमारीज् शिवशक्ती भवन, भगत ले-आउट येथे सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत झालेल्या या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. ‘रक्तदान करा, कल्याण करा’ या संदेशातून नागरिकांना रक्तदानासाठी प्रेरित करण्यात आले. अपघात, शस्त्रक्रिया, प्रसूती तसेच विविध आजारांवरील उपचारादरम्यान रुग्णांना मोठ्या प्रमाणात रक्ताची गरज भासते. त्यामुळे रक्तदान हे केवळ सामाजिक कर्तव्य नसून गरजू रुग्णाच्या जीवनाला आधार देणारे महत्त्वपूर्ण योगदान असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शिबिराला ग्रामीण रुग्णालय सेलूच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वांदिले…

Read More