जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळा सेंद्री/ बूज येथे शाळा व्यवस्थापन समिती निवड करण्याकरिता पालक सभा मा.श्री.विनोदजी बागडे माजी उपसभापती पं स पवनी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सौ. दिपीका कोरे सरपंच, श्री श्रीपत मरघडे उपसरपंच , सौ. ज्योती वैद्य पोलीसपाटील, श्री बापुलाल थेर त. मु स.अध्यक्ष त्याचप्रमाणे श्री.बावनकर सर मुख्याध्यापक, श्री कावरे सर, कु. प्रिती कोचे मॅडम, श्री.हेमने सर यांच्या प्रमुख उपस्थितीत शाळा व्यवस्थापन समिती ची *बिनविरोध* निवड करण्यात आली.iया मध्ये सौ. दीपाली रामप्रसाद चोपकर यांची अध्यक्ष तसेच श्री विशाल देवराम तुपटे यांची उपाध्यक्ष तसेच श्री उमेश चोपकर, श्री सुधीर शेंडे श्री चंद्रकांत शहारे, श्री.संजय मोहनकर, सौ सीमा पाऊलझगडे , सौ. कांता कांबळी, सौ. शिल्पा खोब्रागडे, सौ. नलीनी नागरिकर ,सौ. सुषमा मेश्राम, सौ. ज्योती लांडगे यांची सदस्य म्हणून अविरोध निवड करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष उपाध्यक्ष व सर्व सदस्यांचे शाळेच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


