Author: Ashok Kummari

Ashok Kummari

मुख्य संपादक : अशोक कुम्मरी M.C. Journalism 📞 मो. नं. : 7588302155 / 9356288240

गणेश खोब्रागडे /पारशिवनी कन्हान , कांद्री शहर विकास मंचच्या वतीने सत्कार सोहळ्याचे आयोजन कन्हान : कन्हान , कांद्री शहर विकास मंचच्या वतीने ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नागरिकांसह शहरातील नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मंचचे मार्गदर्शक भरत सावळे होते. प्रमुख अतिथी म्हणून माजी मुख्याध्यापिका सौ. विशाखा ठमके, लीलाबाई देशमुख, ज्येष्ठ पत्रकार आणि माजी मुख्याध्यापक एन. एस. मालवीय, ज्येष्ठ समाजसेवक शांतराम जळते, प्रकाश नाईक, श्रीराम नांदुरकर, माजी सैनिक जयवंत गटपाडे, रविकुमार रंग, अरविंद अंबासकर, मोहनसिंग यादव आदी मान्यवर उपस्थित होते.मान्यवरांच्या हस्ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महाराष्ट्राचे आराध्यदैवत…

Read More

गणेश खोब्रागडे /पारशिवनी कन्हान श्री श्याम सरकार परिवार कन्हान यांच्या वतीने आयोजित ‘श्री श्याम झुला महोत्सव’ अत्यंत भक्तिमय वातावरणात व उत्साहात पार पडला. हा भव्य कार्यक्रम रविवारी सायंकाळी ७.०० वाजता स्थानिक कुर्यात सदा मंगलम कार्यालय अशोक नगर, कन्हाय येथे आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित श्याम भक्तांनी बाबा श्याम यांच्या चरणी नतमस्तक होऊन भक्तीचा आनंद लुटला. श्रावण महिन्याच्या पावन पर्वावर आयोजित या भजन संध्येत सुप्रसिद्ध भजन गायक मोनु अग्रवाल , विद्या धार्मिक, पौर्णिमा दीदी आणि त्यांच्या टीमने एकापेक्षा एक सरस भक्तीगीते व भजनांची सादरीकर णे करून संपुर्ण वातावरण मंत्रमुग्ध करून टाकले. भजनांच्या मधुर सुरांवर भाविक उशिरापर्यंत…

Read More

​सेलू/अभय बेदमोहता स्थानिक मेडिकल चौकातील एका एटीएम केंद्रावर नागरिकांची नजर चुकवून एटीएम कार्डची अदलाबदल करत गंडा घालणाऱ्या परराज्यातील सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळण्यात सेलू पोलिसांना मोठे यश आले आहे. जरी या गुन्ह्याच्या तपासातील सुरुवातीच्या प्रक्रियेत सचिन वाटखेडे व अखिलेश गव्हाने यांना हटविण्यात आले असले, तरी या प्रकरणातील मूळ आरोपींचा शोध घेत त्यांना जेरबंद करण्यात या पोलिसांचा हातखंडा कौशल्य आणि तपासाची धडाकेबाज हातोटी पुन्हा एकदा सिद्ध झाली आहे! ​ दिनांक १३/०७/२०२६ रोजी तक्रारदार लिलाधर वसंतराव नागपुरकर (वय ४३, रा. सुकळी स्टे., ता. सेलू) हे मेडिकल चौकातील एस.बी.आय. बँकेच्या एटीएममधून पैसे काढत असताना ही घटना घडली. दोन अज्ञात आरोपींनी त्यांच्या मागे उभे…

Read More

​सेलु/अभय बेदमोहता ग्रामविकासाचा गाडा हाकण्यासाठी महत्त्वाची मानली जाणारी ‘ग्रामसभा’ म्हणजे जणू काही खेळखंडोबा बनल्याचा संतापजनक प्रकार जिल्ह्यातील सेलू तालुक्यातील ‘हेलोडी’ ग्रामपंचायतीमध्ये समोर आला आहे. नोटीस बोर्डवरील विषयांना फाट्यावर मारत, ग्रामस्थांना कोणतीही पूर्वकल्पना न देता थेट आरोग्य विभागाला हाताशी धरून वेगळाच विषय लादण्यात आला. यातच ग्रामसेवक कार्यालयात हजर असूनही ग्रामसभेत संपाचे नाटक रचत सरपंच-ग्रामसेवकांनी ग्रामस्थांच्या डोळ्यात धूळफेक केली आहेहेलोडी ग्रामपंचायतीमध्ये पारदर्शक कारभाराचा पूर्णपणे बोजवारा उडाला असून सरपंच आणि ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप उसळला आहे. नुकत्याच आज २४ ऑगष्ट रोजी पार पडलेल्या ग्रामसभेत नियोजित विषयांवर चर्चा करणे अपेक्षित असताना, सरपंचांनी मनमानी करत गोंधळ घातला.ग्रामसभेच्या अधिकृत नोटीसवर जे विषय नमूद…

Read More

वर्धा/ अभय बेदमोहता जिल्हा अंतर्गत येणाऱ्या खरांगना परिसरातील मासोद येथील जिवनराव यांचे शेतात तब्बल १३ फूट लांबीचा महाकाय अजगर सापडल्याची घटना उघडकीस आली आहे. एवढ्या मोठ्या आकाराचा अजगर पाहिल्यानंतर स्थानिकांच्या अंगाचा थरकाप उडाला होता. परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ​मिळालेल्या माहितीनुसार, आज श्रावण सोमवारचे सकाळी मासोद येधील जिवनराव यांचे शेतात एक संशयास्पद हालचाल दिसून आली. जवळ जाऊन पाहिल्यावर त्यांच्या लक्षात आले की, तिथे एक प्रचंड मोठा अजगर विश्रांती घेत होता. अजगराचा अवाढव्य आकार पाहून स्थानिकांची धावपळ उडाली. अजगराचा आकार आणि धोका लक्षात घेता, नागरिकांनी तातडीने न घाबरता संयम दाखवत याची माहिती सर्पमित्र कुणाल डोंगरे व वनविभागाला…

Read More

सेलु/अभय बेदमोहता नागपूर-वर्धा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ वरील ढाब्याजवळ रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत आढळलेल्या अनोळखी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना २३ऑगस्ट रोजी मध्यरात्री २४ च्या पहाटेच्या सुमारास उघडकीस आली. हळदगाव टोलनाका येथील ढाब्याजवळ महामार्गाच्या कडेला एक महिला पडून असल्याची माहिती पोलिसांना प्राप्त झाली.महिला अंदाजे ४० ते ४५ वर्षांची असून ती जखमी अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळून आली. तिला तत्काळ रुग्णवाहिकेने ग्रामीण रुग्णालय, सेलू येथे दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.मृत महिलेने पिवळ्या व लालसर रंगाची साडी आणि फिकट गुलाबी रंगाचा ब्लाउज परिधान केला होता. तिच्या गळ्यात पांढऱ्या प्लास्टिकच्या मण्यांची माळ होती. तिच्याजवळील पिशवीची पाहणी केली…

Read More

गणेश खोब्रागडे /पारशिवनी  कन्हान : – कन्हान पोलीस स्टेशन अंतर्गत गहुहिवरा चौक परिसरातील माल धक्क्या जवळ एका ५० वर्षीय व्यक्तीने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार, (दि.२३) ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी मर्ग दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे . मृत व्यक्तीचे नाव संतोष बनवारीलाल गुप्ता (वय ५० वर्षे), रा.हनुमान नगर, कन्हान असे आहे.प्राप्त माहितीनुसार मृत संतोष गुप्ता हे ट्रक चालक म्हणून काम करीत होते. त्यांना दारू पिण्याची सवय होती. मागील काही दिवसांपासून ते अधिक प्रमाणात दारूचे सेवन करीत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. शनिवार (दि.२२) ऑगस्ट रोजी दारू पिण्यासाठी पैसे नसल्याने त्यांनी मोबाईल विकून दारू…

Read More

सेलू : अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यास देणाऱ्या पालकांविरोधात सेलू पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. २२ ऑगस्ट रोजी ऑल आऊट मोहीम व नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी अशा पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली.यापुढे अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास संबंधित पालकांवर मोटर वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणेदार पंकज वाघोडे यांनी दिला.पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

Read More

सेलू/अभय बेदमोहता माहेर शांती निवास वृद्धाश्रम सेलू घोराड चे वतीने श्रावण महोत्सव 2026 उत्साहपुर्ण वातावणात आनंदात साजरा करण्यात आला यात सेलूतील शितला माता महिला भजन मंडळाचे महिलांनी गीतावर सादर केलेले नृत्य अनेकांचे लक्ष वेधून घेणारे ठरले यात सहभागी वयोवृध्द महिलांच गितांचे तालावर थिरकणारे पाय पाहता अनेकांचे चेहर्‍यावर आनंद दिसून येत होता सुरवातीला पार्बतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा हे गित सादर करण्यात आले त्यानंतर श्रावणावर आधारीत झिलमिल झिलमिल पाऊस झाला, झिरमिर करी मदनाचा वारा या गीतावर भजनी मंडळीसह महिलांनी नृत्य सादर केले माहेरच्या या श्रावण महोत्सवात पारंपारीक मराठी वेशभूषा धारण करीत सहभागी सुनंदा खोडे, कुसुम महाजन, मीरा येळणे, रत्ना घवघवे, छाया…

Read More

गणेश खोब्रागडे /पारशिवनी कन्हान  योग सखी बहुउद्देशीय संस्था व योग सखी परिवार व्दारे श्रावण सरी सोहळा साजरा करण्यात आला. श्रावण सरी सोहळ्यासाठी येस हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. ज्योती ढगे कार्यक्रमाच्या उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणुन उपस्थित होत्या. डॉ. ज्योती ढगे आपल्या भाषणात म्हणाल्यात की महिलांनी अंध श्रद्धेच्या मानसिक गुलामीतुन बाहेर निघुन विज्ञानवाद व महापुरुषांच्या विचारांचा स्वीकार करावा. तसेच सावित्रीबाई फुले ह्यांच्या शैक्षणिक संघर्षावर प्रकाश टाकला. महिलांनी उखाणे, नक्कल, नृत्य विविध खेळ या माध्यमातुन आपल्यातील सुप्त कलागुणांचे उत्कृष्ट सादरीकरण केले. यात ८० महिलांनी सहभाग घेतला. इंडियन नेव्हीत क्लास वन ऑफिसर म्हणुन सिलेक्शन झालेल्या मोनाली लुचे चा सत्कार करण्यात आला. आदिवासी विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक…

Read More