ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहता
ग्रामीण भागात आणि यात्रा-उत्सवांच्या काळात खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सणासुदीच्या किंवा जत्रेच्या गर्दीचा फायदा घेऊन ग्राहकांच्या आरोग्याशी खेळण्याचे प्रकार घडत असून, सिंदी रेल्वे बस स्टॅण्ड परिसरात घडलेल्या एका प्रकाराने यावर पुन्हा प्रकाश टाकला आहे.स्थानिक श्री गजानन महाराज मंदिराच्या परिसरात रात्री उशिरा येणाऱ्या भक्तांसाठी कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून रात्री १० ते १२ च्या दरम्यानही भक्त निवासात निःशुल्क आणि पोटभर नाश्ता मिळण्याची उत्तम व्यवस्था असते. मात्र, या आध्यात्मिक आणि सेवाभावी वातावरणाच्या अगदी उलट प्रकार कालच्या येथील विदर्भातील नावाजलेल्या ‘नंदी पोळ्या’च्या सणानिमित्त भरलेल्या बाजारात पाहायला मिळाला.काल नंदी पोळ्याच्या निमित्ताने सिंदी रेल्वे बस स्टॅण्डच्या बाजूला एका दुकानदाराने लावलेल्या दुकानातून काही नागरिकांनी समोसे खरेदी केले. परंतु, हे समोसे पूर्णपणे कच्चे आणि निकृष्ट दर्जाचे असल्याचे समोर आले. शिल्लक राहिलेले हे अर्धवट कच्चे समोसे दुकानदाराच्या निदर्शनास आणून देण्याऐवजी किंवा तसेच टाकण्याऐवजी नागरिकांनी तेथीलच एका मुतारीजवळ लावलेल्या झाडांच्या संरक्षणासाठी केलेल्या रोपट्यांच्या खट्ट्यात टाकून दिले.विशेष म्हणजे, हे समोसे तिथेच रात्रभर पडून होते आणि आज दुपारचे १२ वाजले असलेतरी परिसरातील एकाही मोकाट जनावराने किंवा श्वानाने ते खाण्यास तोंड लावला नाही. अन्नपदार्थ खाण्यात पटाईत असलेली जनावरेही या निकृष्ट आणि कच्चे समोसे खाण्यापासून दूर राहिल्याने, त्या समोशांची गुणवत्ता नेमकी कशी असेल आणि ते किती निकृष्ट दर्जाच्या साहित्यातून तळले गेले होते, याची चर्चा आता परिसरात रंगली आहे.सणासुदीच्या काळात अशा प्रकारे खादयपदार्थांची उघडपणे विक्री होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला असून, संबंधित अन्न व औषध प्रशासन किंवा स्थानिक प्रशासनाने अशा फेरीवाल्यांवर व दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.


