Author: Ashok Kummari

Ashok Kummari

मुख्य संपादक : अशोक कुम्मरी M.C. Journalism 📞 मो. नं. : 7588302155 / 9356288240

भंडारा  युवा, विद्यार्थी, शेतकरी, कामगार आणि महिलांचा राहुल गांधी यांच्यावरील विश्वास वाढत आहे. संविधान, लोकशाही, सामाजिक न्याय आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी ते सक्षम नेतृत्व देऊ शकतात, असा विश्वास व्यक्त होत आहे.इंडिया आघाडीसोबतची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची बांधिलकी कायम असून, पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करत आहे.आगामी काळात संविधान, लोकशाही आणि सर्वसमावेशक विकासासाठी इंडिया आघाडी अधिक मजबूत होणे गरजेचे आहे. राहुल गांधी यांच्या नेतृत्वात देशाला नवी दिशा मिळू शकते, हा जनतेचा वाढता विश्वास आहे. संविधान वाचवा | लोकशाही वाचवा | देश मजबूत करा माजी आमदार चरणभाऊ वाघमारे जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, भंडारा

Read More

सिरोंचा:- टेकडा: पावसाळ्याचे दिवस सुरू असतानाच टेकडा परिसरातील ३० हून अधिक गावांचा वीज पुरवठा रात्रभर खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागला. एकीकडे उकाडा आणि दुसरीकडे पावसाळ्‍यामुळे वाढलेला डासांचा प्रादुर्भाव, अशा दुहेरी संकटात ग्रामस्थांची संपूर्ण रात्र जागून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, काल रात्री तांत्रिक बिघाडामुळे परिसरातील ३० गावांची वीज अचानक खंडित झाली. महावितरणकडून दुरुस्तीचे काम वेळेत न झाल्याने संपूर्ण रात्र अंधारातच काढावी लागली. पावसाळ्याचे दिवस असल्याने सध्या परिसरात ठिकठिकाणी पाणी साचून डासांची मोठी समस्या निर्माण झाली आहे. रात्रभर वीज नसल्याने पंखे बंद होते, त्यामुळे डासांच्या चाव्याने नागरिक विशेषतः लहान मुले आणि वृद्ध त्रस्त झाले. साथीच्या आजारांचा धोका वाढला पावसाळ्‍यामुळे डासांचे…

Read More

पवनी | वार्ताहर ओबीएन ऑलिम्पियाडच्या वतीने आयोजित विदर्भस्तरीय चित्रकला स्पर्धा रविवार, दि. २३ ऑगस्ट रोजी सावित्रीबाई फुले विद्यालय, पवनी येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. इयत्ता पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांच्या कल्पनाशक्तीला चालना मिळावी आणि चित्रकलेच्या माध्यमातून सर्जनशीलतेला व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.सकाळी ९ ते ११ या वेळेत झालेल्या या स्पर्धेत एकूण ७८ विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. इयत्तानिहाय विविध विषय देण्यात आल्याने विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पनाशक्तीचा व कलाकौशल्याचा सुंदर आविष्कार चित्रांमधून साकारला.या स्पर्धेत सावित्रीबाई फुले विद्यालय, वैनगंगा पब्लिक स्कूल, रेनबो पब्लिक स्कूल, मॉडर्न इंग्लिश स्कूल, वैनगंगा विद्यालय, डॉ. आंबेडकर विद्यालय, न.पा. विद्यालय, विकास विद्यालय,…

Read More

​वर्धा/अभय बेदमोहता  जात वैधता व कागदपत्रांच्या अडीअडचणी दूर करण्याची मागणी…! बेलदार (ओड) भटका समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक आणि ऐतिहासिक विकासासाठी प्रलंबित असलेल्या विविध मागण्यांचे निवेदन मृद व जलसंधारण मंत्री मा. श्री. संजय राठोड यांच्या उपस्थितीत आयोजित DNT प्रवर्गाच्या संयुक्त सहविचार सभेत सादर करण्यात आले. बेलदार समाज, महाराष्ट्र राज्याच्या वतीने हे निवेदन देण्यात आले असून, समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासनाने तातडीने कालबद्ध निर्णय घ्यावा, अशी आग्रही मागणी करण्यात आली आहे.समाजातील बहुतांश कुटुंबे आजही आर्थिक व सामाजिकदृष्ट्या मागासलेली आहेत. विशेषतः जात प्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र आणि नॉन-क्रीमी लेयर मिळवण्यात येणाऱ्या तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण आणि करिअर धोक्यात आले आहे. जुन्या कागदपत्रांच्या अभावामुळे…

Read More

अंकिसा प्रतिनिधी/वेंकटस्वामी चकिनाला सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत अंकिसा अंतर्गत येणाऱ्या राघवरावनगर येथे रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. पावसाळा सुरू होताच संपूर्ण रस्ता चिखलमय बनत असून नागरिकांना गुडघ्यापर्यंत चिखलातून मार्ग काढत जावे लागत आहे.या रस्त्यालगत जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी केंद्र असल्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दररोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन रागवरावनगर येथे लवकरात…

Read More

सेलू / अभय बेदमोहता सेलू :- नागपूरहून माहूरच्या दिशेने दर्शनासाठी जात असलेल्या प्रवासी ट्रॅव्हलरचा सेलूजवळील रमणा फाट्याजवळ शनिवारी दुपारी अपघात झाला. ओव्हरटेक करताना ट्रॅव्हलरची टिप्परला धडक बसल्याने सुमारे १२ भाविक जखमी झाले.अपघाताची माहिती मिळताच सेलू पोलीस, महामार्ग पोलीस, रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींना तातडीने बाहेर काढून तीन रुग्णवाहिकांच्या मदतीने सेवाग्राम व वर्धा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.गुजरात येथील भाविक माहूरच्या दर्शनासाठी प्रवास करत होते. शनिवारी दुपारी सुमारे २.१५ वाजता रमणा फाट्याजवळ जेएच-०५ टीसी-१८५१ क्रमांकाच्या टिप्परला ओव्हरटेक करत असताना डी.डी.-०३ डब्ल्यू-९६६६ क्रमांकाच्या ट्रॅव्हलरची टिप्परला धडक झाली.या अपघातात अनेक प्रवासी जखमी झाले. जखमींची प्रकृती आणि दुखापतींचे स्वरूप…

Read More

गणेश खोब्रागडे /पारशिवनी तालुका  कन्हान : -पोलीस स्टेशन हद्दीतील वार्ड क्र. ५ कांद्री येथे अज्ञात चोरट्याने घराचे कूलुप तोडुन घरफोडी केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत सोन्याचे दागिने व रोख रकमेसह अंदाजे १ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार मंगेश गजानन वंजारी वय ३८ वर्ष रा. वार्ड क्र. ५, कांद्री- कन्हान हे डाटा अँनालि सिसचे काम करतात. शनिवार (दि.१५) ऑगस्ट रोजी रात्री सुमारे ८ ते ८.३० वाजताच्या दरम्यान मंगेश आप ल्या कुटुंबासह घराला कूलुप लावुन नागपुर येथील सासुरवाडीला गेले होते. दरम्यान रविवार (दि.१६) ऑगस्ट रोजी दुपारी सुमारे १ वाजता दरम्यान त्यांना…

Read More

अंकीस  सिरोंचा तालुक्यातील अंकिसा येथे दर मंगळवर आठवड्याला भरला जाणारा साप्ताहिक भाजीपाला बाजार सध्या मुख्य रस्त्यावर (नॅशनल हायवे) भरत असल्यामुळे नागरिक आणि वाहनचालकांसाठी मोठा धोका निर्माण झाला आहे.बाजारासाठी ग्रामपंचायत अंकिसा यांनी स्वतंत्र नियोजित जागा उपलब्ध करून दिली असतानाही काही व्यापाऱ्यांनी मुख्य रस्त्यावरच दुकाने लावण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे रस्त्यावर गर्दी वाढून वाहतुकीत अडथळा निर्माण होत आहे.विशेषतः बाजाराच्या दिवशी वाहनांची ये-जा मोठ्या प्रमाणात होत असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. स्थानिक नागरिकांनी याबाबत अनेक वेळा तक्रारी केल्या असूनही अद्याप ठोस कारवाई झालेली नाही.ग्रामपंचायतीने बाजारासाठी दिलेल्या जागेवरच दुकाने लावावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच संबंधित कंत्राटदारांनी नियमांचे पालन करावे, अन्यथा…

Read More

सिरोंचा : गडचिरोली येथे आयोजित ग्रामीण रुग्णालय, सिरोंचा येथे मोफत हृदय तपासणी शिबिरासाठी आलेल्या ५ वर्षीय श्रावीण चेन्नूरी याची इंजेक्शन दिल्यानंतर प्रकृती बिघडून मृत्यू झाल्याच्या घटनेची निष्पक्ष व सखोल चौकशी करावी, अशी मागणी तालुका पत्रकार संघटनेने केली आहे.रंगयापल्ली येथील मोहन व गंगू चेन्नूरी यांचा मुलगा श्रावीण याला आरोग्य विभागाच्या माध्यमातून हृदय तपासणी शिबिरासाठी आणण्यात आले होते. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, ग्रामीण रुग्णालयातील वॉर्डमध्ये इंजेक्शन दिल्यानंतर काही वेळातच त्याची प्रकृती बिघडली व त्याचा मृत्यू झाला.घटनेतील इंजेक्शनचे नाव, बॅच क्रमांक, मात्रा, उपचार नोंदी, CCTV फुटेज व संबंधित वैद्यकीय कागदपत्रांची तपासणी करून स्वतंत्र समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी संघटनेने केली आहे. दोष निश्चित झाल्यास संबंधितांवर…

Read More

मा. मुख्याधिकारी यांना काँग्रेस तर्फे निवेदन. ​सध्या पवित्र श्रावण मास सुरू असल्याने शहरातील प्रभू श्रीराम मंदिर, श्री विठ्ठलेश्वर मंदिर, श्री बालाजी मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, पोचम्मा मंदिर व इतर प्रमुख मंदिरे तसेच दर्गा परिसरात दर्शनासाठी नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे सदर सर्व मंदिर परिसर आणि दर्गा परिसर तातडीने स्वच्छ करून त्या ठिकाणी ब्लीचिंग पावडरची फवारणी करण्यात यावी.​तसेच, पावसाळ्याचे दोन महिने लोटले तरी शहरात अद्याप नियमित फॉगिंग (धूर फवारणी) सुरू करण्यात आलेली नाही, ज्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर संपूर्ण शहरात…

Read More