ही बातमी आता तुम्ही तुमच्या भाषेत वाचू शकता :
मा. मुख्याधिकारी यांना काँग्रेस तर्फे निवेदन.
सध्या पवित्र श्रावण मास सुरू असल्याने शहरातील प्रभू श्रीराम मंदिर, श्री विठ्ठलेश्वर मंदिर, श्री बालाजी मंदिर, सिद्धेश्वर मंदिर, हनुमान मंदिर, पोचम्मा मंदिर व इतर प्रमुख मंदिरे तसेच दर्गा परिसरात दर्शनासाठी नागरिक व महिलांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. त्यामुळे सदर सर्व मंदिर परिसर आणि दर्गा परिसर तातडीने स्वच्छ करून त्या ठिकाणी ब्लीचिंग पावडरची फवारणी करण्यात यावी.तसेच, पावसाळ्याचे दोन महिने लोटले तरी शहरात अद्याप नियमित फॉगिंग (धूर फवारणी) सुरू करण्यात आलेली नाही, ज्यामुळे शहरात डासांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढला असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.तरी या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर संपूर्ण शहरात व मंदिर परिसरात स्वच्छता, ब्लीचिंग पावडर फवारणी आणि नियमित फॉगिंग सुरू करण्यात यावी. जर प्रशासनाने या महत्त्वाच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर सिरोंचा शहरातील नागरिकांकडून नगरपंचायतीच्या नावावर भीक मागून जमा केलेल्या पैशातून ब्लीचिंग पावडर विकत घेतली जाईल आणि लोकप्रतिनिधींच्या घरासमोर ती टाकून व त्या परिसरात स्वतःहून फॉगिंग करून निषेध नोंदवण्यात येईल. लोकप्रतिनिधींना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देण्यासाठी ही टोकाची पावले उचलली जातील, याची कृपया नोंद घ्यावी.