अंकिसा प्रतिनिधी/वेंकटस्वामी चकिनाला
सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत अंकिसा अंतर्गत येणाऱ्या राघवरावनगर येथे रस्त्याची अत्यंत बिकट अवस्था झाली आहे. पावसाळा सुरू होताच संपूर्ण रस्ता चिखलमय बनत असून नागरिकांना गुडघ्यापर्यंत चिखलातून मार्ग काढत जावे लागत आहे.या रस्त्यालगत जिल्हा परिषद शाळा तसेच अंगणवाडी केंद्र असल्यामुळे लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांनाच मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. दररोज शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना जीव धोक्यात घालून या रस्त्यावरून ये-जा करावी लागत आहे.स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तोंडी तक्रारी करूनही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तरी संबंधित प्रशासनाने या समस्येकडे तात्काळ लक्ष देऊन रागवरावनगर येथे लवकरात लवकर सीसी रोडचे बांधकाम करावे अशी जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.


