ए बी के न्यूज लाईव्ह के गणेश /पारशिवकेनी
कन्हान : – भारत सरकार २०२६ च्या जनगणनेत इतर मागासवर्गीय (ओबीसी) समाजाची स्वतंत्रपणे गणना करून जनगणना पत्रिकेत ‘ओबीसी’साठी स्वतंत्र कॉलम समाविष्ट करावा, अशी मागणी श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेच्या कन्हान शहर शाखे च्या वतीने करण्यात आली. या मागणीचे निवेदन रामटेक लोकसभा मतदारसंघाचे खासदार श्यामकुमार बर्वे यांना देण्यात आले. बुधवारी (ता.१६) सप्टेंबर ला श्री संताजी अखिल तेली समाज संघटनेचे प्रदेशाध्यक्ष तथा संस्था पक अनिल विठोबा बजाईत यांच्या नेतृत्वात युवा आघाडी विदर्भ महासचिव तथा कन्हान शहर अध्यक्ष सुनील सरोदे आणि नागपुर जिल्हा संपर्क प्रमुख सूर्यभान चकोले यांच्या पुढाकाराने हे निवेदन देण्यात आले. ओबीसी समाजाची अचुक लोकसंख्या, सामा जिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती याबाबत अधिकृत आणि सर्वंकष आकडेवारी उपलब्ध होणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमुद करण्यात आले आहे.देशातील विविध समाजघटकांसाठी शिक्षण, रोजगार, आरक्षण, आर्थिक विकास आणि सामाजिक कल्याणा च्या योजना आखताना अधिकृत लोकसंख्यात्मक व सामाजिक-आर्थिक आकडेवारी महत्त्वाची ठरते. मात्र ओबीसी समाजाची स्वतंत्र व सर्वंकष अधिकृत जनग णना झालेली नसल्याने त्यांच्या वास्तविक लोकसंख्ये बाबत तसेच सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक स्थिती बाबत अचुक आकडेवारी उपलब्ध नसल्याचा मुद्दा संघ टनेने उपस्थित केला आहे. परिणामी ओबीसी समाजा साठी आखण्यात येणाऱ्या धोरणांच्या नियोजनावर आणि अंमलबजावणीवर परिणाम होऊ शकतो असेही निवेदनात म्हटले आहे. त्यामुळे २०२६ च्या जनगणनेत ओबीसींची स्वतंत्र नोंद करावी आणि जनगणना पत्रि केत ‘ओबीसी’साठी स्वतंत्र कॉलम ठेवावा, अशी प्रमु ख मागणी करण्यात आली. ही मागणी कोणत्याही एका राजकीय पक्षाशी संबंधित नसुन सामाजिक न्याय , समान संधी आणि अचुक लोकसंख्यात्मक आकडेवा रीशी निगडित राष्ट्रीय महत्त्वाचा विषय असल्याचे संघ टनेने स्पष्ट केले. रामटेक लोकसभा मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी या नात्याने खासदार बर्वे यांनी हा प्रश्न संसदेत प्रभावी पणे मांडावा, केंद्र सरकारचे लक्ष वेधावे आणि ओबी सी जनगणनेसह स्वतंत्र कॉलमसाठी ठाम भूमिका मांडावी, अशी अपेक्षा संघटनेने व्यक्त केली. यावेळी कन्हान शहर सचिव ऋषभ बावनकर, सुनिता मानकर, सुषमा मस्के, भगवान लांजेवार, मनोहर कोल्हे, संजय चोपकर, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी, सदस्य व नागरिक मोठ्या प्रामुख्याने उपस्थित होते.


