दहेगाव (गो) भ्रष्टाचार प्रकरणी ग्रामस्थांची चार ठिकाणी तक्रार दाखल….
सेलु/अभय बेदमोहता 
सरपंच व ग्रामसेवक निलंबनाच्या उंबरठ्यावर
तालुक्यातील दहेगाव (गोसावी) नजिकच्या
मौजा किन्हाळा येथील बोगस खानपट्टा, नाहरकत प्रमाणपत्र व ग्रामपंचायत दहेगाव (गोसावी) मधील भ्रष्टाचार प्रकरणी आज समस्त ग्रामस्थांनी जिल्ह्याचे चारही वरिष्ठ कार्यालयात लेखी तक्रार दाखल केली आहे.
मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद वर्धा, जिल्हाधिकारी वर्धा, जिल्हा खनिकर्म अधिकारी वर्धा आणि गटविकास अधिकारी सेलू* या चारही कार्यालयात तक्रार अर्जावर *दि. 01/09/2026 रोजी आवक शिक्का* घेण्यात आला आहे. (आवक प्रत सोबत जोडली आहे)
*ग्रामस्थांचा आरोप असा आहे की -*
मौजा किन्हाळा स.नं. 26/1/2 वरील खानपट्ट्यासाठी ग्रामसभेचा ठराव बंधनकारक असताना, सरपंच व ग्रामसेवक यांनी दि. 20/05/2026 च्या मासिक सभेच्या ठरावात खोडतोड करून तो दि. 29/05/2026 चा ग्रामसभा ठराव म्हणून दाखवला आणि बोगस नाहरकत प्रमाणपत्र दिला. दि. 25/08/2026 रोजी पंचायत समितीच्या चौकशी समितीने 8 रजिस्टर जप्त केले असून त्यात वेगवेगळ्या शाईचा वापर व खोडतोड आढळून आली आहे.
दि. 31/08/2026 रोजी झालेल्या ग्रामसभेत गटविकास अधिकारी समाधानकारक कारवाई न करू शकल्याने ग्रामस्थांनी पोलीस स्टेशन दहेगाव (गोसावी) येथे *स्टेशन डायरी क्र. 154/31.08.26* अन्वये BNS कलम 318, 336, 340 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
*ग्रामस्थांच्या यातील प्रमुख मागण्या अशा आहेत कि,*
मौजा किन्हाळा व दहेगाव (गोसावी) परिसरातील सर्व गौण खनिज खदानी तात्काळ बंद कराव्यात.
सरपंच व ग्रामसेवक यांना तात्काळ निलंबित करावे.
जप्त केलेले प्रोसिडिंग बुक फॉरेन्सिक लॅबला पाठवावे.
या प्रकरणी आमदार समीर कुणावार यांच्या मार्फत मुख्यमंत्री कार्यालयाकडे देखील तक्रार पाठवण्यात आली आहे.
*- समस्त ग्रामस्थ, दहेगाव (गोसावी) व किन्हाळा*


