ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहता
श्री संत नानाजी महाराज तान्हा पोळा उत्सव समिती,गुरगाव चे वतीने व सर्वांच्या सहकाऱ्यांने सलग विसाव्या वर्षी स्थानिक ग्राम पंचायत कार्यालयासमोर तान्हा पोळ्याचे आयोजन करण्यात आले होते.याप्रसंगी मंचकावर हभप नारायणराव पाटील,सुरेंद्र वानखेडे माजी ग्रामपंचायत सदस्य,नारायणराव वानखेडे उपाध्यक्ष सेवा सहकारी संस्था तसेच राजूभाऊ बांते हजर होते. मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर, संतश्रेष्ठ श्री संत नानाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व नंदीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संपूर्ण गावांमधून नंदीची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. या पोळ्यात जवळपास 250 नंदी सहभागी झाले होते. त्यातून उत्कृष्ट नंदी व उत्कृष्ट वेशभूषा याकरिता स्वर्गीय समीर धांदे स्मृती प्रित्यर्थ मित्रपरिवार व तान्हा पोळा उत्सव समितीच्या वतीने रोख पुरस्कार देण्यात आले त्यानंतर वर्ग दहावीत प्रथम येणारे मोहित विजय पंधरे व कु. इशा गजानन डोंगरे व बारावीत प्रथम येणारी कु. तनुश्री भास्कर नेहारे तसेच जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेत निवड झालेले खेळाडू आर्यन दामोदर सहाकाटे, प्रणव सुरेशराव मेहता, वैष्णव सुरेशराव मेहता त्याचबरोबर सौर ऊर्जा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे इंजिनियर निखिल प्रफुल वानखेडे व आधुनिक पद्धतीने शेती करणारे शेतकरी मित्र संदीप सूर्यभानजी पाटील व मनोज रमेशराव वानखेडे यांना मान्यवरांच्या हस्ते सुरगाव भूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर आगीमध्ये संपूर्ण घर जळून गेल्यामुळे शब्बीर पठाण यांच्या मुलाला समितीच्या वतीने 5000/ रुपये रोख शिक्षणासाठी म्हणून मदत देण्यात आली. सोबतच सहभागी सर्व बालगोपालांना शैक्षणिक साहित्याची किट व खाऊचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी पोळ्याच्या झडत्या ,महादेवाचे गाणे मोठ्या प्रमाणात गावकऱ्यांनी सादर केले.तर तरुणांनी ढोल ताशाच्या गजरात नाचून आपला आनंद व्यक्त केला. याप्रसंगी गावकरी ,महिला, तरुण मंडळी मोठ्या प्रमाणात हजर होते. या कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी सर्व ग्रामस्थांनी व तरुणांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार समितीचे प्रमुख श्री श्याम वानखेडे माजी उपसरपंच ग्रामपंचायत सुरगाव यांनी मानले.


