सिरोंचा :-
असरअल्ली पोलीस ठाणे येथे नुकतेच पदभार स्वीकारलेले नवनियुक्त पोलीस निरीक्षक गोळगे साहेब यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकारी जिल्हाध्यक्ष बनाय्या जनगम आणि सिरोंचा तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी यांनी सदिच्छा भेट घेतली.यावेळी पुष्पगुच्छ प्रदान करून पोलीस निरीक्षक गोळगे साहेब यांचे औपचारिक स्वागत करण्यात आले. तसेच त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.या भेटीदरम्यान असरअल्ली परिसरातील गावांच्या विविध समस्या, नागरिकांनाच्या अडचणी, सार्वजनिक सुरक्षितता तसेच परिसरातील कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.गावातील नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी संबंधित विविध प्रश्नांवरही यावेळी चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागातील नागरिकांना पोलीस प्रशासनाकडून आवश्यक सहकार्य मिळावे, तसेच नागरिक आणि पोलीस विभाग यांच्यातील समन्वय अधिक मजबूत व्हावा, याबाबतही विचारविनिमय झाला.नवनियुक्त पोलीस निरीक्षक गोळगे साहेब यांच्या कार्यकाळात परिसरातील कायदा व सुव्यवस्था अधिक प्रभावीपणे राखली जाईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला


