मुख्य संपदक/अशोक कुम्मरी
आसरअल्ली
गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यातील आसरअल्ली वनपरिक्षेत्रांतर्गत पातानी येथील जंगल परिसरात २६ एप्रिल २०२६ रोजी वनविभागाने कारवाई करत अवैध सागवान लाकूड तस्करी उघडकीस आणली होती. या कारवाईदरम्यान जप्त करण्यात आलेल्या दोन बैलांचा आता बुधवार, ४ नोव्हेंबर २०२६ रोजी जाहीर लिलाव आयोजित करण्यात आला आहे.आसरअल्ली वनपरिक्षेत्र अधिकारी शिवाजी पानगे व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली होती. जप्त केलेले दोन्ही बैल लिलावापूर्वी इच्छुक खरेदीदारांना पाहणीसाठी आसरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. नागरिकांनी प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन बैलांची पाहणी करावी आणि लिलाव प्रक्रियेत मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन वनविभागाकडून करण्यात आले आहे.

लिलावाचे ठिकाण, वेळ व तारीख,वनविभागाने दिलेल्या माहितीनुसार, हा जाहीर लिलाव ४ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत अस्थायी विक्री आगार, सिरोंचा–आसरअल्ली रोड, सिरोंचा, ता. सिरोंचा, जि. गडचिरोली येथे पार पडणार आहे. लिलावात एकूण दोन बैलांचा समावेश आहे.लिलावासाठी महत्त्वाच्या अटी व शर्ती,लिलावात सहभागी होणाऱ्या इच्छुक खरेदीदारांनी काही महत्त्वाच्या अटींचे पालन करणे आवश्यक आहे.बैलांची पाहणी: बोली लावण्यापूर्वी इच्छुकांनी आसरअल्ली वनपरिक्षेत्र कार्यालयात जाऊन दोन्ही बैलांची प्रत्यक्ष पाहणी करावी. अनामत रक्कम: अंदाजित बोलीच्या १० टक्के रक्कम अनामत म्हणून जमा करावी लागेल. ही रक्कम किमान १,००० रुपये असणे आवश्यक आहे. यशस्वी बोलीदाराची अनामत रक्कम अंतिम बोलीच्या रकमेत समायोजित केली जाईल.पूर्ण रक्कम भरणे: बोली मंजूर झाल्यानंतर त्याच दिवशी नियमानुसार लागू करांसह संपूर्ण रक्कम भरून बैलांचा ताबा घ्यावा लागेल. आवश्यक कागदपत्रे: लिलावात सहभागी होताना ७/१२ उतारा, आधारकार्ड आणि पॅनकार्ड सोबत आणणे आवश्यक आहे.एक वर्ष विक्रीवर निर्बंध: लिलावात खरेदी केलेला बैल किमान एक वर्ष दुसऱ्या व्यक्तीस विकता येणार नाही. यासाठी खरेदीदाराला एक वर्षाचे हमीपत्र लिहून द्यावे लागेल. या अटीचे उल्लंघन झाल्यास वनविभागाकडून फौजदारी कारवाई केली जाईल, असे नमूद करण्यात आले आहे.वनविभागाचे नागरिकांना आवाहन,या लिलाव प्रक्रियेत इच्छुक नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह सहभागी व्हावे. लिलावासंदर्भातील सविस्तर माहिती वनपरिक्षेत्र कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर तसेच वनविभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचे सांगण्यात आले आहे.दरम्यान, आवश्यकतेनुसार लिलाव पुढे ढकलण्याचा किंवा रद्द करण्याचा अधिकार उपवनसंरक्षक, सिरोंचा यांनी राखून ठेवला आहे.


