वर्धा/अभय बेदमोहता
ज्या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी स्वदेशी कपड्यांची होली जाळली होती, ती ऐतिहासिक जागा वर्धा नगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे आजही उपेक्षित आहे. नुकत्याच झालेल्या नगराध्यक्ष निवडणुकीत ‘टिळक पुतळा’ हा विषय चांगलाच गाजला होता. नगराध्यक्षपदासाठी भाजपचे तत्कालीन बांधकाम सभापती उमेदवार रिंगणात होते, परंतु त्यांचा पराभव झाला. आता पराभवानंतर “टिळक पुतळ्याचे काय झाले?” असा सवाल नागरिक विचारत असून, त्यावर उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.मागील २० वर्षांतील स्थिती आणि दुर्लक्षवर्धेतील गोलबाजार परिसर प्रसिद्ध असून, येथे जाजोदिया यांनी बागेसाठी नगरपालिकेला जागा दान दिली होती. याच परिसरात लो. टिळकांनी स्वदेशी कपड्यांची होली केली होती. ती भेट वर्धेकरांच्या स्मरणात राहावी म्हणून तिथे सिमेंटची पाटी लावली व त्याच काळात टिळकांचे अग्रलेखही तिथे लावले गेले होते.तत्कालीन नगराध्यक्ष शेंडे यांनी पालिकेमार्फत गोलबाजारामध्ये अर्धकृती पुतळा बसवून लोकमान्यांचे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यानंतर गेल्या २० वर्षांपासून या पुतळ्याभोवती घाणीचे साम्राज्य पसरले असून तो उपेक्षितच राहिला आहे.त्यानंतर नगराध्यक्ष अतुल तराळे यांच्या नेतृत्वात नगरपालिकेत भाजपची एकहाती सत्ता आली. किटे हे बांधकाम सभापती असतानाही टिळकांचे भाग्य उजळले नाही. ‘सेवाग्राम विकास आराखडा’ वर्धेच्या विकासाला हातभार लावणारा ठरला, पण टिळक पुतळ्याच्या सौंदर्यीकरणाचा अजेंडा केवळ कागदोपत्रीच राहिला.सध्याची राजकीय चर्चापालिका निवडणुकीत टिळक पुतळ्याचा विकास हा मुद्दा ‘ अधून मधून सातत्याने उचलण्यात आला होता. या निवडणुकीत नगराध्यक्ष पदावर काँग्रेसचे सुधीर पांगुळ निवडून आले. दरम्यान, १४ ऑगस्ट रोजी महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी अ. भा. आर्यवत संघाच्या कार्यक्रमाला भेट दिल्याने हा विषय पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, “महाशय सत्तेत असताना काय करत होते?” असा रोख ठोक प्रश्न नागरिक आता विचारत आहेत.


