ए बी के न्यूज लाईव्ह
के गणेश /पारशिवनी
कन्हान : – राष्ट्रीय एकता दिनानिमित्त शनिवार, ३१ ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० वाजता कन्हान पोलीस स्टेशनच्या वतीने राष्ट्रीय एकता दौडीचे आयोजन करण्यात आले. कन्हान पोलीस स्टेशन येथून सुरू झालेली ही दौड कांद्री परिसरापर्यंत काढण्यात आली. या दौडीच्या माध्यमातून राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक सलोख्याचा संदेश देण्यात आलापोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या एकता दौडमध्ये कन्हान पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व अंमलदार, पोलीस पाटील, इंदिरा गांधी शाळेतील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला.यावेळी पोलीस निरीक्षक वैजयंती मंडवधरे यांनी उपस्थित विद्यार्थी व नागरिकांना मार्गदर्शन करताना राष्ट्रीय एकता दौड ही केवळ धावण्याची स्पर्धा नसून देशाची एकता, अखंडता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा अधिक दृढ करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम असल्याचे सांगितले. जात, धर्म व भेदभाव विसरून सर्वांनी एकजुटीने राहावे तसेच देशप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना प्रत्येकाच्या मनात रुजवावी, असे आवाहन त्यांनी केले.पोलीस अधिकारी, पोलीस पाटील आणि विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कन्हान ते कांद्रीपर्यंतची ही एकता दौड देशप्रेम, शिस्त आणि एकजुटीचा संदेश देत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली.


