ए बी के न्यूज लाईव्ह
के गणेश /पारशिवनी 
कन्हान : – सध्या धान पिक दाने भरण्याच्या प्रकियेत असल्याने पाणीची अत्यंत गरज असताना अचानक केबीसी प्रणाम शाखा कालवा (दि.३०) ऑक्टोंबर ला बंद करण्यात आल्याने परिसरातील धान उत्पादक शेतकरी संतापुन कालव्याच्या मेन गेट जवळ सर्व शेतकरी एकजुटीने एकत्र आल्याने संबधित अधिका-यांना घटनास्थळी येऊन शेतक-यांची न्यायिक बाजु ऐकल्यावर केबीसी प्रमाण शाखा कालवा पुर्वरत सुरू करण्यात आल्याने उपस्थित शेतक-यांनी शासनाचे व अधिका-यांचे आभार व्यकत करून या दुष्काळ परिस्थितीत धानाचे तरी काही अंशी चांगले उत्पादन घेण्या करिता दहा दिवस हा कालवा सुरू ठेवण्याची मागणी केली आहे. केबीसी प्रणाम शाखा कालवा (दि.३०) ऑक्टों बर ला अचानक बंद करण्यात आल्याने परिसरातील धान उत्पादक शेतकऱ्यांमध्ये भयंकर चिंता व भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे कालवा बंद करण्याची निर्धारित मुदत (दि.५) नोव्हेंबर २०२६ होती. धान पीक सध्या दाणे भरण्याच्या अंतिम अवस्थेत असल्याने या काळात पाणी मिळणे अत्यंत आवश्यक आहे. पाणी बंद केल्याने हाताशी आलेले धान पीक धोक्यात येण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत होती.या गंभीर परिस्थितीची जाणीव होताच वाघोली, वराडा , खंडाळा, मेहंदी, बखारी, केरडी, एसंबा, टेकाडी, निमखेडा, बोरडा, खेडी, खोपडी, निस्दखेडा, सालवा, कूंभापुर, कोपरा, मांगली, नानादेवी यांसह अनेक गावांतील शेतकरी एकत्र आले आणि केबीसी कालव्या जवळ एकजुटीने आपली भूमिका मांडली. शेतकऱ्यां चे संघटन आणि एकजुट पाहुन संबंधित अधिकारी वर्गाला घटनास्थळी यावे लागले. शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत बंद करण्यात आलेला केबीसी कालव्याचा पाणी पुरवठा पुन्हा सुरू करण्यात आल्याने ” शेतकरी एकता जिंदाबाद !”, ” जय जवान, जय किसान !” चा जयघोष करून शेतक-यांनी आंनद व्यक्त करून शासनाचे व अधिका-यांचे आभार व्यक्त करून या दुष्काळ परिस्थितीत धानाचे तरी काही अंशी चांगले उत्पादन घेण्याकरिता दहा दिवस हा कालवा सुरू ठेवुन पाणी देण्याची मागणी केली आहे . या शेतक-यांच्या एकजुटीच्या घटनेतुन एक गोष्ट स्पष्ट झाली की, शेतकरी एकजुटीने उभा राहिला तर आपल्या हक्कासाठी मोठा लढा उभा करू शकतो. हा विजय कोणत्याही एका गावाचा नसुन कालव्याच्या पाण्यावर अवलंबुन असलेल्या सर्व शेतकऱ्यांच्या एक जुटीचा आहे. असा विश्वास शेतक-यांनी बोलुन दाखविला.


