ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहता
एका लोकप्रिय आणि जनमानसात मिसळणाऱ्या नेत्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त होत असून, या धक्कादायक घटनेमुळे वडगाव खुर्द गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सेलू तालुक्यातील वडगाव खुर्द येथील माजी सरपंच मारोती किसनजी मोगरकर (वय अंदाजे ५५ वर्षे) यांनी आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन जीवन संपवल्याची अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे. घरच्या घरी घडलेल्या या टोकाच्या प्रकाराने सर्वांनाच विचलित केले आहे.घटना उघडकीस आल्यानंतर रुग्ण मित्र प्रज्वल लटारे यांनी तातडीने तत्परता दाखवत मोगरकर यांना उपचारासाठी सेलू येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती. डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.मृत्यूचे कारण सध्या गुलदस्त्यात असूनघटनेची माहिती मिळताच सेलू पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली.पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा पूर्ण करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.दरम्यान, मारोती मोगरकर यांनी हे टोकाचे पाऊल नेमके का उचलले? याबाबतचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी कसून तपास करत आहेत.मारोती मोगरकर हे अत्यंत लोकप्रसिद्ध आणि मनमिळाऊ व्यक्ती म्हणून परिचित होते. त्यांच्या अशा अचानक आणि अवेळी निधनामुळे वडगाव खुर्दसह परिसरात तीव्र दुःखाची लहर पसरली असून, ग्रामस्थांनी एका हरहुन्नरी नेत्याला मुकल्याची भावना व्यक्त केली आहे.


