ए बी के न्यूज लाईव्ह
वर्धा/अभय बेदमोहता 
बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव येथून वर्ध्यातील सोमनाथे लेआउट (रामनगर) येथे देवीची मूर्ती आणताना झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. आज कारला चौकातून वाजतगाजत देवीची मिरवणूक काढून मूर्ती मंडपात स्थापन केली जाणार होती. मात्र, मिरवणुकीपूर्वीच झालेल्या या भीषण अपघातात ५ जणांचा घटनास्थळी व दोघांचा रुग्णालयात उपचारा दरम्यान असे ७ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून १३ जण जखमी झाले आहेत. यातील तिघांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.या घटनेमुळे देवीच्या आगमनाच्या उत्साहावर दुःखाचे सावट पसरले असून सोमनाथे लेआउटसह संपूर्ण वर्धा शहरात शोककळा पसरली आहे. अपघातात मृत्यू झालेल्यांपैकी पाच जणांची नावे समोर आली आहेत. हे सर्व सोमनाथे लेआउट, रामनगर (वर्धा) येथील रहिवासी आहेत,
दत्ता खुरसंगे (वय ५३ वर्ष)
प्रवीण बकाने (वय ५० वर्ष)
घनश्याम पाटील (वय ६० वर्ष)
गोलू उर्फ सचिन बदलमवार (वय ३८ वर्ष)
ओम गावंडे (वय २२ वर्ष)
तर उर्वरित २ मृतकांची नावे अद्याप प्राप्त झालेली नाहीत.
अपघातात गंभीर जखमी १३ जणांची
नावे खालील प्रमाणे असून त्यांच्यावर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आहेत.
सागर ढोले (२५)
राहुल मेहेकर
रोशन राऊत (२६)
नयन गोदाके (३०)
पवन ढोले
मुणेश्वर ढोले (५३)
अमित ठाकरे
सतीश कुडे (३५)
नंदू शिरसकर
दिनेश पवनकर
यश मलकापूर (३०)
सतीश राऊत
नरेंद्र सोयाम (४९)
रुग्णालयात उपचार सुरू आहे.यातील तिघांची परिस्थिती गंभीर असल्याचे सांगितले जात आहे.
अपघाताची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली व स्थानिक नागरिकांनी मदतीसाठी धाव घेतली. जखमींची सावंगी तसेच पुलगाव येथील विविध रुग्णालयांत उपचार सुरु आहे. घटनास्थळी व रुग्णालयात नागरिकांनी मोठी गर्दी केली आहे.


