ए बी के न्यूज लाईव्ह 
सिरोंचा : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत कार्यरत ग्रामसखी व कॅडरच्या विविध मागण्यांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिरोंचा तालुक्यातील उमेद महिला ग्रामसखी संघटनेने संपूर्ण कामबंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. याबाबत संघटनेच्या वतीने १ ऑक्टोबर २०२६ रोजी गटविकास अधिकारी, पंचायत समिती सिरोंचा यांना निवेदन देण्यात आले.ग्रामसखी ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक व सामाजिक सक्षमीकरणासाठी विविध शासकीय योजनांची माहिती, ऑनलाइन नोंदणी, डिजिटल व्यवहार, बँकिंग कामकाज, प्रशिक्षण, सर्वेक्षण तसेच जनजागृतीची कामे करीत असल्याचे संघटनेने निवेदनात म्हटले आहे. मात्र, त्यांच्या विविध मागण्यांबाबत अद्याप ठोस निर्णय झालेला नसल्याने ग्रामसखींमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे मानधनाबाबत स्पष्टता व वाढीची मागण ऑक्टोबर २०२६ पासून ग्रामसखींचे मानधन किती असणार, याबाबत स्पष्टता देण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच ग्रामसंघस्तरीय ग्रामसखींसाठी ₹१५ हजार, तर प्रभागसंघस्तरीय ग्रामसखीसाठी ₹२४ हजार मासिक मानधन देण्याची मागणी संघटनेने केली आहे.तक्रार निवारण समितीत संघटनेच्या प्रतिनिधींचा समावेशग्रामसखी किंवा कॅडरविरोधात तक्रार झाल्यास गठीत होणाऱ्या तक्रार निवारण समितीत उमेद महिला ग्रामसखी संघटनेचा जिल्हा किंवा तालुका प्रतिनिधी तसेच कॅडर संघटनेच्या अधिकृत प्रतिनिधीचा समावेश करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.कॅडरसाठी विमा, मोबाईल व इंटरनेट खर्चाची मागणीगावोगावी आणि विविध ठिकाणी कामासाठी प्रवास करावा लागत असल्याने कॅडरला किमान ₹२० लाखांचे विमा कवच देण्यात यावे, अशी मागणी आहे. तसेच ऑनलाइन कामांसाठी टॅब किंवा मोबाईल उपलब्ध करून देण्याबरोबरच इंटरनेट व रिचार्जचा खर्च शासनाने करावा, अशी मागणी करण्यात आली आहे.सन्मानपूर्वक वागणुकीची मागणीकॅडरला काम करताना अपमानजनक भाषा, अवमानकारक वर्तन किंवा अनुचित वागणूक मिळू नये. त्यांना सन्मानपूर्वक व सुरक्षित वातावरणात काम करता यावे, याबाबत शासन व संबंधित अधिकाऱ्यांनी स्पष्ट हमी द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.दरम्यान, कॅडरच्या मागण्यांबाबत शासनाकडून देण्यात आलेली लेखी हमी/आश्वासनाची प्रत (OC) तसेच संघटनेने यापूर्वी साद केलेल्या मागण्यांच्या निवेदनाची प्रत संपूर्ण कॅडर संघटनेला उपलब्ध करून देण्यात यावी, अशीही मागणी करण्यात आली आहे.मागण्यांबाबत ठोस निर्णय घेऊन लेखी स्वरूपात माहिती मिळेपर्यंत कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय संघटनेने घेतला आहे. कामबंद आंदोलनाच्या कालावधीतील मोबदला मिळणार नसल्याची जाणीव असूनही सर्व कॅडर या निर्णयास सहमत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.संघटनेने आपल्या मागण्यांचा गांभीर्याने विचार करून शासन व प्रशासनाने तातडीने भूमिका स्पष्ट करावी आणि ग्रामसखींना लेखी स्वरूपात आश्वासन द्यावे, अशी मागणी केली आहे.


