ए बी के न्यूज लाईव्ह
प्रतिनिधी देवेंद्रकुमार रंगुवार 
अंकिसा : मा. पोलीस अधीक्षक श्री. एम. रमेश सर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. जी. गोकुळराज सर (प्रशासन), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. कार्तिक सर (अभियान), मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. हर्षवर्धन सर (अहेरी) तसेच मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. समाधान पाटील सर (सिरोंचा) यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन असरअल्लीचे प्रभारी अधिकारी मा. सपोनि युवराज घोडके यांच्या नेतृत्वाखाली श्रीनिवास हायस्कूल, अंकिसा येथे दिनांक 29 सप्टेंबर रोजी “पोलीस काका-दीदी” उपक्रमांतर्गत सायबर जनजागृती तसेच “Good Touch–Bad Touch” विषयावर जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.यावेळी परीपोउपनी प्रफुल भोयर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन असरअल्लीचे पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमास इयत्ता 10 वी व 12 वीतील सुमारे 100 ते 120 विद्यार्थी-विद्यार्थिनी उपस्थित होते.विद्यार्थ्यांना ऑनलाइन फसवणूक, OTP, ATM/डेबिट कार्ड, UPI, QR कोड, बनावट लिंक, सोशल मीडिया अकाउंट, फेक प्रोफाईल, सायबर बुलिंग तसेच अनोळखी व्यक्तींकडून येणारे फोन व संदेश याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. OTP, PIN, पासवर्ड, बँक खात्याची माहिती अथवा वैयक्तिक माहिती कोणत्याही अनोळखी व्यक्तीस देऊ नये तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, असे आवाहन करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांना “Good Touch–Bad Touch” बाबत मार्गदर्शन करून सुरक्षित व असुरक्षित स्पर्श ओळखणे, अयोग्य स्पर्शास स्पष्टपणे नकार देणे आणि अशा प्रकारची घटना घडल्यास ती लपवून न ठेवता पालक, शिक्षक किंवा पोलिसांना तात्काळ माहिती देण्याबाबत जनजागृती करण्यात आली.सायबर फसवणूक अथवा सायबर गुन्ह्याची घटना घडल्यास घाबरून न जाता तात्काळ सायबर हेल्पलाईन क्रमांक 1930 वर संपर्क करण्याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये सायबर सुरक्षा, वैयक्तिक सुरक्षितता आणि सुरक्षित इंटरनेट वापराबाबत जागरूकता निर्माण करण्यात आली. “सुरक्षित इंटरनेट वापर, स्वतःची सुरक्षितता आणि सावध नागरिक” हा संदेश देत सदर कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.


