ए बी के न्यूज लाईव्हके
सेलू/अभय बेदमोहता
‘सेवा संकल्प अभियाना’अंतर्गत आयोजित तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत यशवंत विद्यालय घोराड येथील वर्ग ९ वी ची विद्यार्थिनी कु. तनवी नंदरे हिने आपल्या कलागुणांच्या जोरावर द्वितीय क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे. या यशामुळे तिची जिल्हास्तरीय चित्रकला प्रदर्शनीसाठी निवड झाली आहे.केंद्र शासनाच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेवर आधारित सेलू तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत तालुक्यातील अनेक शाळांमधील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला होता. यात तनवीने आपल्या उत्कृष्ट चित्रकलेच्या माध्यमातून द्वितीय क्रमांकावर आपले नाव कोरले.तनवीच्या या विशेष यशाबद्दल वर्धा येथील मान्यवरांच्या हस्ते तिचा प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला. यामध्ये जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या सौ. जयश्रीताई घारपळकर मॅडम, प्राचार्य डॉ. मंगेश घोगरे साहेब आणि माध्यमिक उपशिक्षणाधिकारी महेंद्र गजभिये साहेब यांनी तिचे कौतुक करत पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या.आपल्या या यशाबद्दल बोलताना तनवीने, या यशाचे सर्व श्रेय यशवंत विद्यालय घोराड येथील मुख्याध्यापक, मार्गदर्शक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आपल्या पालकांना दिले आहे. तनवीच्या या यशामुळे घोराड परिसर व शाळेत तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


