ए बी के न्यूज लाईव्ह के गणेश /पारशिवनी
कन्हान
आगामी गणेश विसर्जन तसेच विविध सणांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्याच्या उद्देशाने कन्हान पोलिसांच्या वतीने बुधवार, दि. २३ सप्टेंबर रोजी रूट मार्च व मॉक ड्रिलचे आयोजन करण्यात आलसहायक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी शशांक गौड़ा यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या नेतृत्वात कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील प्रमुख मार्गांवर रूट मार्च काढण्यात आला. तसेच तारसा चौक येथे मॉक ड्रिल घेऊन आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास पोलिसांची तत्परता, कार्यपद्धती व त्वरित प्रतिसाद क्षमता तपासण्यात आली.या रूट मार्च व मॉक ड्रिलमध्ये QRT पथकातील १९ पोलीस कर्मचारी, कन्हान पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी तसेच होमगार्ड जवान सहभागी झाले होते. पोलिसांनी शहरातील प्रमुख मार्गांवर संचलन करून आपली उपस्थिती दर्शविली.यावेळी आपत्कालीन परिस्थितीत विविध पथकांमध्ये असलेला समन्वय, पोलिसांची तत्परता आणि परिस्थिती नियंत्रणात आणण्याची कार्यक्षमता यांचा आढावा घेण्यात आला.आगामी गणेश विसर्जनासह विविध सण-उत्सव शांततेत पार पडावेत आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला प्रभावीपणे सामोरे जाता यावे, यासाठी कन्हान पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या माध्यमातून देण्यात आला.रूट मार्च व मॉक ड्रिलदरम्यान कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील परिस्थिती शांततापूर्ण व नियंत्रणात राहिली. कोणतीही अनुचित घटना घडल्याची माहिती नाही.


