
सिरोंचा विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस मुलांचे निवासी वसतिगृह, सिरोंचा येथे गृहप्रमुख साईराम सेनिगारपु यांच्या अभिनव संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या ‘अधिकारी संवाद व विद्यार्थी कौशल्य विकास’ उपक्रमाचा दुसरा दिवस वन विभाग, सिरोंचा यांच्या सहकार्याने उत्साहात पार पडला. कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने करण्यात आली.यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून भारतीय वन सेवा (IFS) अधिकारी तथा उपवनसंरक्षक श्री. नवकिशोर रेड्डी, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. राजेश अंधारे आणि परिविक्षाधीन वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. अमित पवार उपस्थित होते.या उपक्रमातून विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील अधिकाऱ्यांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळत असून, त्यांच्यामध्ये आत्मविश्वास, संवादकौशल्य, नेतृत्वगुण, निर्णयक्षमता आणि व्यावहारिक ज्ञान विकसित करण्यावर भर दिला जात आहे. वन विभागाच्या मार्गदर्शनातून विद्यार्थ्यांना पर्यावरण संवर्धन, वन्यजीव संरक्षण आणि भारतीय वन सेवेसारख्या प्रतिष्ठित सेवांविषयी प्रेरणा मिळणार आहे.सप्ताहभर विविध शासकीय विभागांतील अधिकारी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार असून, गृहप्रमुख साईराम सेनिगारपु यांच्या या अभिनव उपक्रमाचे उद्दिष्ट विद्यार्थ्यांना भविष्यातील आव्हानांसाठी सक्षम बनविणे हे आहे.


