ए बी के न्यूज लाईव्ह
सेलु/अभय बेदमोहता
शासनाचे कर्जमाफीत नाव आहे,फार्मर आयडी काढलेली आहे पण ती लिंक नसल्याने केवाईसी करण्यात अडचण येत आहे. असा शेतकरी फार्मर आयडीच्या लिंक साठी दारोदार फिरत आहे.शासनाचे साईडमधे दोष असल्याने अशा शेतकर्यांवर शासनाचे कर्जमाफी पासून वंचित राहण्याची पाळी आली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून यासाठी ऑनलाईन सेंटरवर शेतकरी चकरा मारत आहे. याबाबत महसूल प्रशासन, सहाय्यक निबंधक कार्यालयात गेले असता ते आपली जबाबदारी झटकत एक दुसऱ्याकडे बोट दाखवत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शासनाच्या कर्ज माफी मध्ये समावेश असलेल्या शेतकर्यांना केवाईसी करणे गरजेचे आहे. त्यासाठी फार्मर आयडी काढलेली हवी. यात काही शेतकर्यांनी फार्मर आयडी काढलेली असताना ती लिंक झालेली नाही. अशा शेतकर्यांची केवायसी थांबलेली आहे. त्यासाठी शासनाने दिलेल्या साईडवर जाऊन रिसर्वे करावे लागत आहे.पण साईड बरोबर नसल्याने गेल्या पंधरा दिवसापासून शेतकरी त्रस्त झाले आहे. याबाबत जाब कुणाला विचारावा हा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वेळेत हे काम पूर्ण झाले नाही तर त्यांना कर्जमाफीपासून वंचीत राहावे लागेल. याला जबाबदार कोण असा सवाल उपस्थित केला जात आहे. त्याचप्रमाणे दुष्काळी मदतीसाठी फार्मर आयडी आवश्यक आहे. पण काहिंकडे ती नाही अशा शेतकर्यांची फार्मर आयडी साईड बरोबर नसल्याने निघत नाही. या यंत्रेणेतील दोषामुळे दुष्काळी अनुदानापासुन शेतकर्यांना वंचीत राहावे लागेल. शासनाने याची गांभीर्याने दखल घेत या साईडमधील दोषाचे तात्काळ निराकरण करून शेतकर्यांना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकर्याची आहे.


