ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहता
केवळ केक कापून अन् जल्लोष करून वाढदिवस साजरा करण्याच्या आजच्या काळात, लहान वयातच संस्कारांची पेरणी करत एका चिमुकल्याचा वाढदिवस पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा करण्यात आला. येथील नामांकित गुड शेफर्ड इंग्लिश स्कूलमधील नर्सरीचा विद्यार्थी लक्ष प्रशांत झाडे याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. साधेपणाने पार पडलेल्या या उपक्रमातून शाळेने आणि पालकांनी समाजोपयोगी संदेश दिला आहे.वाढत्या वृक्षतोडीमुळे पर्यावरणाचा समतोल बिघडत चालला आहे. या पार्श्वभूमीवर लहान वयातच बालकांवर पर्यावरणाविषयी प्रेम आणि जागरूकतेचे संस्कार व्हावेत, या उद्देशाने समाजसेवक प्रशांत झाडे व गुड शेफर्ड स्कूलच्या शिक्षिका श्वेता झाडे या दाम्पत्याने या उपक्रमाचे आयोजन केले होयाप्रसंगी बोलताना शाळेचे मुख्याध्यापक सतीशजी काटवे आणि पालक प्रशांत झाडे यांनी वृक्षांचे महत्त्व उपस्थितांना पटवून दिले. “झाडे कार्बन डायऑक्साइड शोषून घेऊन निसर्गाला प्राणवायू देतात. प्रदूषण नियंत्रण, हवामानाचा समतोल आणि पावसासाठी वृक्षसंपदा अत्यंत महत्त्वाची आहे. याशिवाय फळे, फुले आणि औषधी वनस्पती मिळण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी झाड लावून त्याचे जतन केले पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले.या उपक्रमादरम्यान वृक्षारोपण करून झाडांच्या संवर्धनाची शपथ घेण्यात आली. या कार्यक्रमाला शाळेतील शिक्षिका रिंकू शिंदे, रंजना धोटे, रीना माहुरे, सोनू शेख, अल्का देवतारे, अश्विनी वानखेडे, काजल नखाते, सुचिता देवतारे, आरती मुडे, उमेश वानखेडे, संदीप नाईक, अभय काळे, प्रवीण फटिंग, अपर्णा पराते, तृप्ती पाटील, अश्विनी डफरे, माधवी तळवेकर यांच्यासह इतर शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


