ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहता
बालकांचे सुदृढ आरोग्य आणि निरोगी भविष्यासाठी संपूर्ण गावात कुपोषणमुक्तीचा ध्यास घेत गट ग्रामपंचायत आमगाव खडकी येथे मशाल जनजागृती रॅलीचा धडाका पाहायला मिळाला. ९ व्या ‘राष्ट्रीय पोषण माह’ (९ सप्टेंबर ते ८ ऑक्टोबर २०२६) उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषद वर्धा, महिला व बाल विकास विभाग, पंचायत समिती सेलू आणि अंगणवाडी खडकी क्र. ६० यांच्या संयुक्त विद्यमाने या भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.आमची अंगणवाडी – आमची जबाबदारी, पोषणमय बालपण – निरोगी भविष्याची तयारी!”या मुख्य घोषवाक्याने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. मशाल हातात घेऊन निघालेल्या या रॅलीत लहान बालके आणि महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.“बालकांची योग्य वाढ व विकास”, “पोषण प्रत्येकाचा हक्क”, “सुदृढ मूल, सुदृढ गाव, समृद्ध भारत” आणि “सही पोषण – देश रोशन” अशा विविध संदेशांचे फलक हातात धरून उपस्थितांनी आरोग्यविषयक जनजागृती केली. या रॅलीच्या माध्यमातून ग्रामस्थांना पोषण अभियानाच्या पाच प्रमुख स्तंभांविषयी सविस्तर मार्गदर्शन करण्यात आलेआहारातील विविधता,अंगणवाडीत मिळणारे गरम व ताजे भोजन,सामुदायिक सहभाग, प्रारंभिक बाल्यावस्थेची योग्य देखभाल वप्रधानमंत्री मातृ वंदना योजना’.अशाप्रकारे ग्रामस्थांमध्ये आरोग्याची ज्योत पेटवणाऱ्या या उपक्रमात अंगणवाडी सेविका प्रतिभा खंडाते, निर्मला ठाकूर, फरीदा पठाण, प्रिती शेंद्रे, योगिता कुडमते, प्रतिभा कोसारे, वंदना कोसारे, विद्या चिडाम यांच्यासह गावातील महिला, माता भगिनी आणि बालके मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीच्या समाप्तीवेळी संपूर्ण आमगाव खडकी गाव कुपोषणमुक्त करण्याचा ठाम संकल्प सर्व उपस्थितांनी केला.


