ए बी के न्यूज लाईव्ह सेलू/अभय बेदमोहता
गणेशोत्सवाचे औचित्य साधून सेलू येथील महाबीज बीज प्रक्रिया केंद्रामध्ये जनसंवाद कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तालुका कृषी अधिकारी रवींद्र राऊत हे होते. या प्रसंगी कृषी विभागाच्या विविध योजना तसेच महाबीजच्या उपक्रमांची सविस्तर माहिती शेतकऱ्यांना देण्यात आली.कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मंडळ कृषी अधिकारी जाधव, जिल्हा बीज प्रमाणीकरण अधिकारी (वर्धा) भनकाळे, कृषी अधिकारी मिलमिले मॅडम, दी हितवाद चे पत्रकार संजय धोंगडे, महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक देवानंद जांगळेकर आणि केंद्र व्यवस्थापक आनंद गावंडे यांची विशेष उपस्थिती होती.या जनसंवाद कार्यक्रमादरम्यान उपस्थितांना मार्गदर्शन करताना कृषी विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, अनुदाने आणि आधुनिक शेतीविषयक उपक्रमांवर प्रकाश टाकण्यात आला. सोबतच महाबीजचे गुणवत्तापूर्ण उत्पादने, बियाणे प्रक्रिया आणि शेतकऱ्यांसाठी असलेल्या विविध योजनांची सविस्तर माहिती अधिकाऱ्यांनी दिली.या कार्यक्रमाला परिसरातील विविध गावांतील शेतकऱ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. यामध्ये महाबळा, कोटंबा, सेलू, घोराड, धानोली आणि सिंदी रेल्वे येथील शेतकरी रवींद्र ढोक, विनोद महाकाळकर, नीळकंठ फंड, नीळकंठ बुरले, आकाश बुरले, अमोल पुंड, गणेश पाहाणे, धीरज वाघमारे, मनोज बाचले यांच्यासह अनेक शेतकरी बांधव उपस्थित होते.कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रदर्शन पल्लवी बनसोड यांनी केले.


