ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहता
सेलू तालुक्यातील जुनगड चौक परिसरात आज दि.२९ सप्टेंबर चे सकाळी ११:३० वाजताच्या सुमारास एक अत्यंत दुर्दैवी व भीषण अपघाताची घटना जघडली. आयपीसीए लॅबोरेटरीच्या भरधाव इनोवा कार क्र. MH47 Q5456 ने दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या या अपघातात २६ वर्षीय तरुणाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे.मिळालेल्या माहितीनुसार, एकनाथ नामदेव सावरकर (वय २६ वर्षे) हे आपल्या दुचाकी क्रं.MH40 AV- 7756 ने कान्होली बारा येथून जुनगडच्या दिशेने येत होते. दरम्यान, जुनगड चौक परिसरात समोरून येणाऱ्या आयपीसीए लॅबोरेटरीच्या इनोवा कारने त्यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली.या अपघातात एकनाथ सावरकर हे गंभीर जखमी झाले. घटनेनंतर त्यांना तात्काळ उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय,सेलु येथे दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.घटनेची माहिती मिळताच सेलू पोलीस ठाण्याच्या पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी अपघातातील इनोवा कार ताब्यात घेतली असून, अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू केला आहे.


