ए बी के न्यूज लाईव्ह
सिरोंचा (गडचिरोली): सिरोंचा तालुक्यात यंदा मिरची लागवडीने वेग घेतला असून आतापर्यंत ८० टक्के लागवड पूर्ण झाली आहे. गेल्या तीन दिवसांपासून पडत असलेल्या हलक्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळाले असून शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे.तालुक्यात मिरची हे जास्त किमतीचे आणि मुख्य नगदी पीक आहे. या पिकाला मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. पावसाने जरी दिलासा दिला असला तरी पुढील काळात पिकाच्या वाढीसाठी आणि फवारणीसाठी नियमित पाणी द्यावे लागणार आहे, त्यासाठी विजेची गरज भासणार आहे.याबत सिरोंचा तालुक्यातील सर्व ग्रामस्थ आणि शेतकऱ्यांनी इलेक्ट्रिक डिपार्टमेंट (महावितरण) चे आभार मानले आहेत. आतापर्यंत लाईट कनेक्शन चांगल्या प्रमाणात दिल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.मात्र मिरची हे नाजूक आणि जास्त किमतीचे उत्पादन असल्याने त्याला वेळेवर पाणी देणे गरजेचे आहे. त्यासाठी लाईट कनेक्शन वेळोवेळी आणि नियमित द्यावे, अशी मागणी सिरोंचा व परिसरातील सर्व शेतकरी बांधवांतर्फे करण्यात येत आहे. वेळेवर वीज मिळाल्यास मिरचीचे उत्पादन चांगले येईल आणि शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होईल.


