ए बी के न्यूज लाईव्ह आरती कुम्मारी
सिरोंचा (गडचिरोली): गडचिरोली जिल्ह्यातील अतिदुर्गम असलेल्या सिरोंचा तालुक्यातील गुम्मलकोंडा ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या चार गावांमध्ये भीषण पाणी टंचाई निर्माण झाली आहे. टाकीपासून येणारे पाणी केवळ एकच दिवस चालले असून त्यानंतर पूर्णपणे बंद झाले आहे, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.गुम्मलकोंडा ग्रामपंचायत मध्ये – १) गुम्मलकोंडा, २) सोमनूर नवीन, ३) सोमनूर जुना आणि ४) मुक्किडीगुट्टा या चार गावांचा समावेश आहे. या चारही गावांमधील कोणत्याही टाकीचे पाणी नागरिकांना मिळत नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. शासकीय कागदोपत्री मात्र योजना चालू असल्याचे दाखवले जात असल्याने संताप व्यक्त होत आहे.सरकारी कामे कधीच वेळेवर पूर्ण केली जात नाहीत. पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना, विशेषतः महिला वृद्धांना लांब अंतरावर जावे लागत आहे. ग्रामस्थांची मागणी:पाणी ही मूलभूत गरज असून, शासनाने याची तात्काळ दखल घ्यावी. पाणी टाकीचे कनेक्शन आणि पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करून चारही गावांना नियमित पाणीपुरवठा सुरू करावा, अशी विनंती गुम्मलकोंडा ग्रामपंचायतीच्या सर्व ग्रामस्थांतर्फे करण्यात येत आहे.a


