ए के न्यूज लाईव्ह बी
वर्धा/अभय बेदमोहता
“शिक्षण आमचा हक्क आहे” आणि “विद्यार्थ्यांची मागणी मान्य करा” अशा घोषणा देत वर्धा जिल्ह्यात प्रशासनाविरोधात रोष व्यक्त करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर किंवा मोर्च्यावर आजचे सत्ताधारी आणि पोलीस यंत्रणेकडून लाठीचार्ज करून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा गंभीर आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. वर्धा जिल्ह्यातील दारूबंदीच्या मुद्यावर सध्या वातावरण चांगलेच तापले आहे। प्रशासनावर ताशेरे ओढत आंदोलकांनी म्हटले आहे की, प्रशासन पाहिजे तेव्हा एका तासात संपूर्ण जिल्ह्याची दारूबंदी करू शकते, तर दुसरीकडे पवनार ते सेवाग्राम सोडून संपूर्ण दारू खुली करून दारूबंदी हटवू शकते। महाराष्ट्रात भेडसावणाऱ्या या समस्येवर प्रकाश टाकत, बनावट व भेसळ दारूमुळे होणारे शारीरिक दुष्परिणाम आणि यामुळे अनेक महिला अल्पवयातच विधवा होत असल्याने त्या कुटुंबावर आणि समाजात दुःखाचा डोंगर कोसळत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. या सर्व प्रकाराचा घोर निषेध करत आणि महात्मा गांधी यांच्या विचारप्रेरणातून २ ऑक्टोबर गांधी जयंती निमित्त त्यांच्या पुतळ्याला अभिवादन करून “दारूबंदी हटवा सत्याग्रह आंदोलना” ची अधिकृत सुरुवात करण्यात येणार आहे. या आंदोलनाची हाक प्रज्ज्वल प्रविणराव टेंभरे (दारूबंदी हटवा कृती समिती, वर्धा) यांनी दिली असून, प्रशासनाने यावर तातडीने ठोस पावले उचलत योग्य तो निर्णय घ्यावा, अशी मागणी जोर धरत आहे।


