ए बी के न्यूज लाईव्ह सेलु/अभय बेदमोहता
भारत सरकारच्या नवीन निर्देशानुसार आता सर्व एलपीजी गॅस कनेक्शनधारकांसाठी बायोमेट्रिक आधार प्रमाणनीकरण म्हणजेच ई-केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. ज्या ग्राहकांनी ही प्रक्रिया अद्याप पूर्ण केलेली नाही, त्यांनी तात्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.जर आपण ३० सप्टेंबर २०२६ पूर्वी आपली ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही, तर आपल्या गॅस सिलिंडरची रिफिल बुकिंग ब्लॉक केली जाऊ शकते. तसेच, आपल्याला घरगुती दराने गॅस रिफिल मिळणार नाही. त्यामुळे कोणत्याही त्रासापासून वाचण्यासाठी अंतिम मुदतीची वाट न बघता लवकरात लवकर हे काम पूर्ण करणे हिताचे ठरेल. आपले एलपीजी कनेक्शन ई-केवायसी खालीलपैकी कोणत्याही एका पर्यायाद्वारे पूर्ण करू शकता: एचपी पे ॲप द्वारे स्वतः ई-केवायसी करण्याचा हा एक अत्यंत सोपा, वेगवान आणि सुरक्षित पर्याय आहे. गॅस सिलिंडर पोहोचवणाऱ्या कर्मचाऱ्यामार्फत आपल्या घरी येऊन ई-केवायसी करून घेण्याची सुविधा देखील उपलब्ध आहे. अन्यथा आपण थेट आपल्या नजीकच्या एचपी गॅस एजन्सी कार्यालयात जाऊन देखील ई-केवायसी पूर्ण करू शकता. “सुरक्षित परिवार, समृद्ध भारत” या संकल्पने अंतर्गत आपल्या गॅस कनेक्शनची ई-केवायसी आजच पूर्ण करण्याचे आवाहन सेलू येथील जवादे गॅस एजेन्सी चे संचालक धर्मेंद्र द्वारे यांनी केले आहे.


