ए के न्यूज लाईव्हबी सेलू/अभय बेदमोहता
सेलू तालुक्यात वन्यप्राण्यांचा उपद्रव दिवसेंदिवस वाढत चालला असून, बिबट्याच्या वाढत्या वावरामुळे शेतकरी व शेतमजुरांमध्ये तीव्र भीतीचे वातावरण पसरले आहे. केळझर येथे गोठ्यात बांधलेल्या एका वासरावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या दोन दिवसांत तालुक्यातील अशी ही दुसरी घटना घडल्याने ग्रामस्थांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे.मौजा केळझर, येथील शेतकरी सुमित्रा ज्ञानेश्वर तेलरांधे यांचे शेतातील गोठ्यात दि.२० सप्टेंबरच्या मध्यरात्री किंवा २१ सप्टेंबरच्या पहाटेच्या सुमारास.शेतातील गोठ्यात बिबट्यांचे प्रवेश करुन तेथे बांधून असलेल्या दोन गायी, एक कारवड आणि वासरुतील वासराच्या फडशा पाडला दबा धरून बसलेल्या बिबट्याने वासराला उचलून मुख्य कालव्याच्या बाजूला असलेल्या झुडपात नेले आणि त्याला ठार केले.सोमवार २१ सप्टेंबर चे सकाळी मुलगा नरेश तेलरांधे दुध आणण्यासाठी शेतात गेले असता हा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. त्यांनी तातडीने ग्रामस्थ व वनविभागाला याबाबत माहिती दिली.वनविभाग व नागरिकांना घटनेची माहिती मिळताच केळझर बिटचे वनरक्षक दत्ता मुसळे व वनमजूर बापुराव सोनटक्के यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला आहे.दिवसाढवळ्या व रात्रीच्या वेळी बिबट्याचा परिसरात अती वावर वाढल्याने शेतकरी आणि शेतमजुरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भीतीमुळे शेतीच्या कामांवरही मोठा परिणाम होत आहे १९ सप्टेंबर रोजी खापरी (मुंगापूर) येथील शेतकरी पुरुषोत्तम वैद्य यांच्या गोठ्यातील एक बोकड व एक बकरीचा बिबट्याने फडशा पाडला होता. ही घटना ताजी असतानाच केळझरमध्ये वासराचा फडशा पाडल्याने भीती अधिकच वाढली आहे.यावर वनविभागाने तातडीने उपाययोजना करून या परिसरातील बिबट्याचा बंदोबस्त करावा.तसेच मुख्यालयी हजर राहून रात्रीच्या वेळी वनविभागात गस्त वाढविण्यात यावी.व नुकसानग्रस्त शेतकरी सुमित्रा तेलरांधे यांना नियमानुसार तात्काळ शासकीय नुकसानभरपाई देण्यात यावी ची मागणी होत आहे.


