ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहता
सेलू पोलिस ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण पथकाने नाकेबंदी करून मोपेडवरून विनापरवाना देशी-विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या तरुणाविरुद्ध कारवाई केली. या कारवाईत दारूसाठ्यासह मोपेड असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.पोलिसांच्या माहितीनुसार, १६ सप्टेंबर २०२६ रोजी सेलू पोलिस ठाण्याचे गुन्हे अन्वेषण पथक परिसरात पेट्रोलिंग करीत होते. यावेळी मुखबिराकडून मिळालेल्या माहितीनुसार, उज्वल सुरेश थुल (वय २१, रा. सुकळी (स्टे.), ता. सेलू) हा काळ्या रंगाच्या सुझुकी बर्गमॅन मोपेडवरून सेलू येथून वाहितपूरकडे दारू घेऊन जात असल्याची माहिती मिळाली.या माहितीच्या आधारे पोलिसांनी वाहितपूर शिवारातील रस्त्यावर नाकेबंदी केली. यावेळी संशयित उज्वल थुल याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता मोपेडच्या डिक्कीत ९० मिलीच्या देशी दारूच्या ८० सीलबंद बाटल्या, तसेच पायदानावर ठेवलेल्या प्लास्टिक पिशवीत ऑफिसर चॉईस कंपनीच्या विदेशी दारूच्या १८० मिलीच्या ४० सीलबंद बाटल्या आढळून आल्या.पोलिसांनी देशी दारूची किंमत ८ हजार रुपये, विदेशी दारूची किंमत १२ हजार रुपये, तर MH-32-AU-6569 क्रमांकाची सुझुकी बर्गमॅन मोपेड किंमत ९५ हजार रुपये, असा एकूण १ लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(अ)(ई) तसेच मोटार वाहन कायदा कलम ३(१), १८१, १३०/१७७ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. गुन्हे अन्वेषण पथकातील अनिल केकतपुरे, रामकिसन इप्पर, विनायक गोडे आणि ओमप्रकाश तल्लारी यांनी कारवाईत सहभाग घेतला.


