ऐ बी के न्यूज लाईव्ह सेलू/अभय बेदमोहता
नुकत्याच वर्धा जिल्हा अथलेटिक्स संघटनेचे तर्फे आयोजित निवड चाचणी मध्ये शौर्य स्पोर्ट्स अकॅडेमी सेलू च्या पाच खेळाडूंची निवड राज्यस्तरीय मैदानी स्पर्धेसाठी झाली आहे. 16 वर्ष आतील मुलींच्या गटात कु. सेजल चौधरी हिने 600 मिटर प्रथम, 18 वर्ष मुली मध्ये कु. भार्गवी मेघे ने गोळा फेक क्रीडा प्रकारात प्रथम,18 वर्ष मुलामध्ये हिमांशू खांदारे ने गोळा फेक मध्ये प्रथम, 18 वर्ष मुलामध्ये अन्वय निलसकर ने 1000 मिटर मध्ये प्रथम आणि 20 वर्ष मुलामध्ये हर्षल सुरुसे ने 1500 मिटर मध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केले, सर्व खेळाडूंची डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे होणाऱ्या जुनिअर अथलेटिक्स स्पर्धेसाठी निवड झाली आहे. सदर स्पर्धा 27 ते 30 ऑगस्ट या कालावधीत आयोजित करण्यात आली.वर्धा अथलेटिक्स संघटनेचे सचिव रमेश बुटे, संघटना पदाधिकारी सुधाकर वाघमारे, शौर्य अकॅडेमी चे मार्गदर्शक अनंत भाकरे, अकॅडेमी चे अध्यक्ष हेमंत नाईकवाडे, उपाध्यक्ष फौजन सैय्यद, प्रशिक्षक आसिफ आशिफ पठाण, पूजा कटरे, हेमंत जाधव,करण देऊळकर, मंगल जगताप आणि संपूर्ण पदाधिकारी व खेळाडूंनी निवड झालेल्या खेळाडूंचे अभिनंदन केले. खेळाडू सोबत व्यवस्थापक म्हणून यश सोनोने स्पर्धेला सहभागी झाले आहे.खेळाडूंनी आपल्या यशाचे श्रेय आपल्या प्रशिक्षकांना, पालकांना दिले.


