सेलु/अभय बेदमोहता,
पोळा सणात सर्वत्र कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी व कोणताही अपप्रकार घडू नये म्हणून पेट्रोलिंग सुरु असता आज दिनांक 07/09/2026 रोजी पोलीस स्टेशन सेलूचे गुन्हे अन्वेषण पथकाला मुखबीरद्वारे माहिती मिळाली की संदीप ठाकरे रा देवनगर (हिंगणी) हा मौजा जुनेवानी शेत शिवारातील नाल्याच्या काठावर गावठी मोहा दारू ची भट्टी काढण्या करिता मोहा रासायन सडवा तयार करीत आहे.या प्राप्त माहितीनुसार जुनेवानी शेत शिवारात पंचासमक्ष मौक्यावर पोहोचुन पाहणी केली असता संदीप ठाकरे देवनगर हिंगणी हा नाल्या च्या बाजूला झाडाझुडपात मोहा सडवा रसायन तयार करत असताना दिसून आला. त्यास पोलीस व पंच आल्याची चाहूल लागतंच तो झाडाझुडपाचा फायदा घेत मोक्यावरून पसारा झाला. मौक्यावरून 11 मोठ्या लोखंडी ड्रम मध्ये प्रत्येकी 200 लिटर प्रमाणे एकूण 2200 लिटर गावठी मोहा दारू काढण्याचा कच्चा मोहा रासायन सडवा किंमत 4’40,000 रुपये ,11 लोखंडी ड्रम किंमत 11,000 रुपये व इतर दारू भट्टीला लागणारे साहित्य असा ऐकून एकुण 4,61,000/- रुपये चा मुद्देमाल जप्त करून पसारा आरोपी संदीप ठाकरे रा. देवनगर हिंगणी ता. सेलू जिल्हा वर्धा यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन सेलू येथे दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे नोंद करण्यात आला सदरची कार्यवाही *मा. पोलीस अधिक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधिक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील महाडीक यांचे निर्देशाप्रमाणे सेलु सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज वाघोडे ठाणेदार, येथील गुन्हे अन्वेषण पथकातील पोलीस अमलदार अनिल केकतपुरे, रामकिसन इप्पर, गजानन कमठाणे यांनी सदरची कार्यवाही केली आहे.*


