सिरोंचा –
मलक्का अंकुल अडुरी राहणार नगरम यांच्या तेरवी कार्यक्रमासाठी माजी राज्यमंत्री राजे अंबरिशराव आत्राम यांनी आर्थिक मदत केली. आज मलक्का अंकुलू अडुरी यांच्या तेरवीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी आर्थिक मदतीची आवश्यकता असल्याने शाहरुख पठाण, अल्पसंख्याक आघाडी तालुका अध्यक्ष, भाजप यांनी राजे अंबरिशराव आत्राम यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून मदतीची विनंती केली. शाहरुख पठाण यांच्या विनंतीला सकारात्मक प्रतिसाद देत राजे अंबरिशराव आत्राम यांनी तेरवी कार्यक्रमासाठी आर्थिक मदत केली. त्यांच्या या सहकार्याबद्दल शाहरुख पठाण यांनी आभार व्यक्त केले.गरजू कुटुंबांच्या अडचणीच्या काळात मदतीचा हात पुढे करून सामाजिक बांधिलकी जपल्याबद्दल राजे अंबरिशराव आत्राम यांचे परिसरातून कौतुक होत आहे. यावेळी राजे समर्थक सुरेश गग्गुरी, प्रवीण बोल्ले, रवितेज चिलमुला, प्रविण चिलमुला, नितीन अड्डरी , साई दासरी, अरुण काशेट्टी, राम सिरंगी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


