सेलु/अभय बेदमोहता
स्थानिक शिव पार्वती मंगल कार्यालय येथे ३० ऑगस्ट रोजी सिदरा मेहंदी क्लासच्या वतीने आयोजित भव्य मेहंदी स्पर्धा आणि प्रमाणपत्र वाटप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या स्पर्धेत सेलू शहर व परिसरातील अनेक विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून एकापेक्षा एक सरस डिझाईन्स काढत आपल्या अप्रतिम मेहंदी कलेचे प्रदर्शन केले.या उत्कृष्ट कलाविष्कार व परीक्षणाची पाहणी हे नागपूरच्या प्रसिद्ध मेहंदी डिझायनर खुशबू पठाण, हिना पठाण आणि सायमा फातेमा यांनी स्पर्धेचे बारकाईने निरीक्षण करून सर्वोत्कृष्ट ५ विजेत्यांची निवड केली.या स्पर्धेतील पाच विजेत्यांना ट्रॉफी, प्रमाणपत्र आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. तसेच, स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व मुलींचा उत्साह वाढविण्यासाठी त्यांना प्रोत्साहनपर ट्रॉफी आणि प्रमाणपत्रे देण्यात आली. या मेहंदी प्रशिक्षणाचा एक महिन्याचा कालावधी पूर्ण केलेल्या २१ विद्यार्थिनींना सिदरा मेहंदी क्लासच्या संचालिका नाजिया साजीद पठाण यांच्या हस्ते प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह (शिल्ड) देऊन सन्मानित करण्यात आले.स्पर्धेचा निकाल घोषित केल्यावरप्रथम क्रमांकावर सानिया सैय्यद,द्वितीय प्रांजली वाघे,तृतीय आयशा शेख,चतुर्थ खुशी अन्सारी तर पाचव्या प्रेरणा मांडवकर राहिल्या.या पारितोषिक कार्यक्रम सोहळ्याचे अध्यक्ष रवींद्र कोटंबकार (संपादक, दैनिक साहसिक) हे होतेतर प्रमुख पाहुणे म्हणून शहेजाद शेख (दैनिक भास्करचे प्रतिनिधी), शकील सुभान शेख (काटोलचे कॉटन किंग), रफीक शेख (हिंगणा येथील उद्योजक), सईद शेख, वकील शेख, शौकत पठाण, खुशबू पठाण व हिना पठाण उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साक्षी बर्डे हिने केले, तर सर्व उपस्थितांचे आभार नाजिया साजिद पठाण यांनी मानले. याप्रसंगी ड्रेस डिझायनर रुबिना ऊर्फ सानिया शेख, शमा पठाण, शबाना महाजन, आफरीन शेख, आसमा शेख यांच्यासह नंदिनी, जान्हवी, स्नेहल, अल्फिया, निकितासह मोठ्या संख्येने विद्यार्थिनी, पालक आणि परिसरातील नागरिक उपस्थित होते.


