ही बातमी आता तुम्ही तुमच्या भाषेत वाचू शकता :
सिरोंचा :-
पेंटीपाका येथे अज्ञात व्यक्तीने एका दुचाकीला आग लावल्याची घटना आज, २५ ऑगस्ट २०२६ रोजी रात्री 2 वाजताच्या सुमारास घडली. या आगीत दुचाकीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून वाहन जवळपास पूर्णपणे जळून खाक झाले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. दुचाकीला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लावण्यात आली, तसेच या घटनेमागे कोणाचा हात आहे, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती मिळालेली नाही.या घटनेमुळे परिसरात चर्चेला उधाण आले असून पोलीस प्रशासनाने घटनेची चौकशी करून दोषी व्यक्तीचा शोध घेऊन कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.


