ही बातमी आता तुम्ही तुमच्या भाषेत वाचू शकता :
सेलू :
अल्पवयीन मुलांना दुचाकी चालवण्यास देणाऱ्या पालकांविरोधात सेलू पोलिसांनी कठोर भूमिका घेतली आहे. २२ ऑगस्ट रोजी ऑल आऊट मोहीम व नाकाबंदी दरम्यान पोलिसांनी अशा पालकांना पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली.यापुढे अल्पवयीन मुले वाहन चालवताना आढळल्यास संबंधित पालकांवर मोटर वाहन कायद्यान्वये कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा ठाणेदार पंकज वाघोडे यांनी दिला.पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.


