ABKNEWSLIVE
मुख्य संपदाक/ अशोक कुम्मरी
सिरोंचा नगरपंचायत प्रशासनाविरोधात कंत्राटदार शबाना परवीन युसूफ खान यांनी आजपासून तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरुवात केली आहे. बाजार व कर वसुलीच्या प्रक्रियेत झालेल्या कथित अनियमितता आणि त्यामुळे झालेल्या आर्थिक नुकसानीचा आरोप करत त्यांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे,शबाना परवीन यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी सिरोंचा आठवडी बाजार व दैनंदिन गुजरी बाजाराचा अधिकृत ठेका घेतला होता. मात्र, कर वसुलीच्या प्रक्रियेत बदल, गाळेधारकांकडून होणारी कर वसुली तसेच मालवाहतूक करणाऱ्या वाहनांकडून कर वसुली करताना निर्माण झालेल्या अडचणींमुळे आपले मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा दावा त्यांनी केला आहे.या प्रकरणी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कारवाई करावी आणि आपले आर्थिक नुकसान भरून काढावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.विशेष म्हणजे, यापूर्वी संबंधित कार्यालयांकडे निवेदने व तक्रारी करूनही समाधानकारक कार्यवाही झाली नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्या महिलेने केला आहे. त्यामुळे अखेर त्यांनी “न्याय मिळेपर्यंत आमरण उपोषण” करण्याचा निर्णय घेतला आहे.आता या आंदोलनामुळे नगरपंचायत प्रशासन काय भूमिका घेणार? आंदोलनकर्त्यांच्या आरोपांची चौकशी होणार का? याकडे सिरोंचा शहराचे लक्ष लागले आहे.
आंदोलनकर्त्यांनी केलेले आरोप त्यांच्या निवेदनावर आधारित असून, नगरपंचायत प्रशासनाची अधिकृत बाजू अद्याप समोर आलेली नाही.
“आरोप गंभीर; आता प्रशासनाच्या भूमिकेकडे लक्ष!”


