ए बी के न्यूज लाईव्ह
सेलू/अभय बेदमोहता
निसर्गाच्या अवकृपेमुळे कोलमडलेल्या बळीराजाच्या जखमेवर मलम लावण्यासाठी शासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले गेलेत. मात्र, सेलू तालुक्यातील हेलोडी ग्रामपंचायतीत शेताच्या बांधावर न जाता केवळ कागदपत्रांची पूर्तता करून कार्यालयात बसूनच पंचनाम्यांचा ‘उरकाऊ कार्यक्रम’ सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका जागृत शेतकऱ्याने या सर्वप्रकाराची तक्रार थेट उपविभागीय अधिकाऱ्यांकडे केल्यानंतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. मात्र, त्यावरूनही सर्वसामान्य शेतकऱ्यांची पाहणी न करता केवळ तक्रारदार शेतकऱ्यालाच धारेवर धरण्याचा प्रकार घडल्याने अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.तुम्ही कागद द्या, बाकी आम्ही बघतो!’ अशा पध्दतीने मिळालेल्या माहितीनुसार, हेलोडी ग्रामपंचायत कार्यालय परिसरात तलाठी, कृषी सहाय्यक, ग्रामसेवक आणि कोतवाल हे प्रत्यक्ष शेताच्या बांधावर जाऊन पाहणी करणे गरजेचे असताना, शेतकऱ्यांनाच ग्रामपंचायतीत बोलावून अर्ज, आधार कार्ड आणि बँक पासबुक गोळा केले जात आहेत.‘ट्रिगर-१’ लागू झाला आहे. म्हणून शेतात जाण्याची गरज नाही. तुम्ही फक्त सही करून कागदपत्रे द्या, आम्ही नुकसान अचूक टाकतो, टेन्शन घेऊ नका,” असे सांगत शेतकऱ्यांची बोळवण केली जात आहे. “खेड्यांतील लोकांना काय समजते? मदत लगेच मिळणार आहे का? आम्ही अर्ज पाठवू मग सरकार विचार करेल,” अशा गप्पा मारून प्रत्यक्ष शेतीवर न जाताच ८० ते ९० टक्के नुकसानीचे आकडे कागदावर लिहून पंचनामे आटोपले जात आहेत.तक्रारदारालाच धरले धारेवरइतर शेतकऱ्यांचे पंचनामे वाऱ्यावरया सावळागोंधळाबाबत एका जागृत शेतकऱ्याने उपविभागीय अधिकारी व वर्धा येथील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे हकीकत मांडली. वरिष्ठ पातळीवरून चौकशीचे आदेश येताच यंत्रणा खडबडून जागी झाली. गुरूवारी दुपारी १ वाजता सर्व संबंधित अधिकारी हेलोडी ग्रामपंचायतीत दाखल झाले.मात्र, संपूर्ण गावातील नुकसानीचे सर्वेक्षण करण्याऐवजी अधिकाऱ्यांनी तक्रारदार शेतकऱ्यालाच, “तुम्ही फोन केला ना? चला, मग तुमच्याच शेताचा पंचनामा करतो,” असे म्हणत धारेवर धरण्याचा प्रयत्न केला. जेव्हा संबंधित शेतकऱ्याने संपूर्ण गावातील शेतांची पाहणी करण्याची विनंती केली, तेव्हा इतर कास्तकारांना कोणतीही पूर्वसूचना न देता अधिकारी तेथून निघून गेले.सगळ्याच शेतकऱ्यांनी आता उपविभागीय अधिकाऱ्यांकडे जायचे काय?’ – गावकऱ्यांचा सवालरस्त्यात भेटणाऱ्या शेतकऱ्यांना “तुमचा पंचनामा झाला, ९० टक्के नुकसान टाकले,” असे सांगून वेळ मारून नेली जात आहे. कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय आणि प्रत्यक्ष बांधावर न जाता कागदोपत्री उरकल्या जाणाऱ्या या पंचनाम्यांमुळे अनेक वंचित शेतकरी योग्य मदतीपासून दूर राहण्याची भीती व्यक्त होत आहे.“कास्तकार दररोज शेतात राहतात, तरीही त्यांना पूर्वसूचना दिली जात नाही. तक्रार केली तरच अधिकारी शेतावर येणार असतील, तर तालुक्यातील सर्वच शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवायचे का?” असा संतप्त सवाल आता हेलोडी येथील शेतकरी विचारत आहेत. याप्रकरणी कामचुकार सर्व अधिकाऱ्यांवर वरिष्ठ पातळीवरून काय कारवाई होते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.


