मुख्य संपदक /अशोक कुम्मरी
सिरोंचा :
सिरोंचा तालुक्यातील अनेक ग्रामीण भागातील रस्त्यांच्या दुतर्फा शेतकऱ्यांकडून रस्त्याच्या हद्दीत अतिक्रमण होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या कडेला झाडांच्या फांद्या, काटेरी झुडपे आणि गवत मोठ्या प्रमाणात वाढल्याने रस्ते अरुंद झाले आहेत.काही ठिकाणी समोरून येणारे वाहनचालक एकमेकांना स्पष्टपणे दिसत नसल्याने अपघाताची शक्यता वाढली आहे. विशेषतः दुचाकीस्वार, चारचाकी आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या वाहनचालकांना याचा मोठा धोका निर्माण झाला आहे.रस्त्याच्या कडेला वाढलेली झाडे-झुडपे तातडीने हटवून रस्त्याची हद्द मोकळी करावी, तसेच रस्त्यावरील अतिक्रमणाची पाहणी करून संबंधित विभागाने कारवाई करावी, अशी मागणी ग्रामीण भागातील नागरिकांकडून होत आहे.,प्रशासनाने मोठा अपघात होण्याची वाट न पाहता तालुक्यातील ग्रामीण रस्त्यांची पाहणी करून अतिक्रमण व झाडे-झुडपे हटविण्याची मोहीम राबवावी, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.


